Breking News
रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खून

महिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या पापा शेखसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

कात्रज बाह्यवळण मार्गावर वेश्याव्यवसाय, गुन्हा दाखल

कुंटण खानाचालकास अटक; बुधवार पेठेत ५ बांगलादेशींवर कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातील बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आणखी ४ महिलासह ५ बांगलादेशी राहत असल्याचे आढळून आले आहे. फरासखाना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. ब्युटीपार्लर, टेलरिंगचे काम देण्याच्या नावाखाली बांगलादेशातून पुण्यात आणून वेश्या व्यवसायाला लावणार्या बाबू भैय्या उर्फ पापा शेख याच्यासह चार जणांवर पोलिसांनी अनैतिक वाहतूक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

अनैतिक संबंधाला केला विरोध केल्याने मनोरूग्ण महिलेचा खून – सविस्तर बातमी

बांगलादेशी एजंट मुल्ला, पापा शेख (रा. बुधवार पेठ), भोपसिंग राजपूत (वय २६, रा. जनता बिल्डिंग, बुधवार पेठ) आणि घरमालकीण मीनाक्षी रमेश मेत्री (रा. बुधवार पेठ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. कुंटणखाना चालक भोपसिंग राजपूत याला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गंगाधर जावळगी यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगवर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा टाकला. पहिल्या मजल्यावर मुळचे बांगलादेशी असलेल्या चार महिला व एक पुरुष आढळून आले. भोपसिंग राजपूत हा कुंटणखाना चालवत होता. तो या महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होता. ग्राहकांकडून आलेले पैसे स्वत:कडे ठेवत होता. घरमालकीण मिनाक्षी मेत्री हिला तो काही पैसे देत होता.

महिलांकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांना ब्युटी पार्लरमध्ये किंवा टेलरिंगचे कामात नोकरी देण्याचे आश्वासन देऊन बांगलादेशी एजंट मुल्ला याने पुण्यात आणून पापा शेख याच्या हवाली केले होते. त्याने जबरदस्तीने पैशाचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने त्यांना त्याचे ऐकण्याशिवाय पर्याय नसल्याने त्यांनी पोलिसांना सांगितले. गेल्या महिन्यात पुणे पोलिसांनी दोनवेळा बुधवार पेठेत छापेमारी केली होती. त्यावेळी जवळपास १२ बांगलादेशी महिला आढळून आल्या होत्या.

पापा शेख हा बुधवार पेठेत आणल्या जाणाऱ्या महिलांचा एजंट म्हणून काम करतो. गेल्या महिन्यातही त्याच्याविरोधात बांगलादेशी महिलांना वेश्या व्यवसायाला लावण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पापा शेख विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×