पुण्यातील वडकी गावातील घटना; आरोपीला अटक
marathinews24.com
पुणे – अनैतिक संबंधाला विरोध करणार्या मनोरूग्ण महिलेच्या डोक्यात मारून तिचा खून केल्याची घटना २८ फेबु्रवारी ते ३ मार्च कालावधीत हडपसर सासवड रस्त्यावर वडकी गावात घडली आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रकाश बिभीषण माने (वय २९, रा. वडकीनाला, हवेली ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार अमोल मोरे (वय ४३) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, महिलेची ओळख पटलेली नाही.
वाहनाच्या धडकेत तरूण ठार, खराडीतील घटना – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी गावातील काची कंपनीच्या गोदामाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत एक महिला मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर फुरसुंगी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. महिलेच्या डोक्यात कठीण वस्तुने प्रहार केल्याचे घडकीस आले. उपचारांपूर्वीच महिलेचा मृत्यू झाला होता. खून झालेल्या महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष आहे. तिची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून महिलेची ओळख पटलेली नाही. हडपसर, सासवड, फुरसुंगी परिसरातून बेपत्ता झालेल्या महिलांची पोलिसांकडून माहिती घेण्यात येत आहे.
कोट- आरोपी प्रकाश माने याने तिचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. याप्रकरणी महिलेचे ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख यांनी दिली आहे.
























