Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

दुकानाचे कूलूप तोडून ७० हजारांची रोकड चोरी

मार्केटयार्डात घरफोडी, ६ लाखांचा ऐवज चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील तुळशीबागेत दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली.
याबाबत शेरसिंग भानसिंग राठोड (वय २७, रा. गोविंद अपार्टमेंट, शुक्रवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यावसायिकाला धमकावून ६० हजारांची रोकड लुटली – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड यांचे तुळशीबागेत रुपश्री इमिटेशन ज्वेलरी हे दुकान आहे. रविवारी तुळशीबागेत खरेदीसाठी गर्दी असते. दिवसभरात जमा झालेली रोकड त्यांनी गल्ल्यात ठेवली होती. चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील ७० हजारांची रोकड चोरून नेली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तुळशीबागेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केेलेले चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.

कार्यालयातून कॅमेरा, मोबाइल चोरी

कर्वेनगर भागातील एका कार्यालयातून चोरट्यांनी महागडा कॅमेरा, तसेच मोबाइल संच असा पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत व्यावसायिक करणराज संदेश मेहता (वय ३८, रा. धनश्री सोसायटी, कर्वेनगर) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहता यांचे कर्वेनगरमधील नवसह्याद्री सोसायटीत कार्यालय आहे. चोरट्यांनी कार्यालयातील खिडकीचा गज तोडून आत प्रवेश केला. कार्यालयातील महागडा कॅमेरा, मोबाइल असा मुद्देमाल चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक दीक्षित तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×