दीनानाथ रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कसून तपासणी

दीनानाथ रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची काटेकोर तपासणी सुरू

Marathinews24.com

पुणे – दीनानाथ रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी गर्भवती महिलेवर उपचार करण्याचे टाळले. यामुळे तिचा मृत्यू झाला. ३१ मार्च रोजी घडलेल्या प्रकारानंतर राज्यस्तरावरून दीनानाथ रुग्णालयासह अन्य धर्मदाय रुग्णालयांवर रोष व्यक्त करण्यात येत आहे. असे

असताना अलंकार पोलिसांनी रुग्णालयात गर्भवती महिला दाखल झाल्यापासून, रुग्णालयातून बाहेर जाईपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले
असून, त्याचा अहवाल ससून प्रशासनाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर जो निर्णय होईल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महिलेच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाविरोधात भिसे कुटुंबियांनी पोलिसांनी तक्रार दिली आहे. तक्रारीत रुग्णालयाने केलेल्या अंतर्गत समितीचा अहवाल जगजाहीर करून दीनानाथ मंगेशकरच्या कमिटी मेंबरवर आणि त्या चार सदस्यांवर बदनामी आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज पोलिसांकडे दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केलेला हा रिपोर्ट सर्वदूर पोहोचला असून, आयव्हीएफ बाबतची माहिती ही आमची खाजगी बाब आहे, त्यात पैशांमुळे उपचार न करणाऱ्या डॉ. घैसास यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील भिसे कुटुंबियांकडून
करण्यात आली आहे. यासंदर्भातील एक पत्र भिसे कुटुंबियांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे दिले आहे.

पोलिसांनी घटनेच्या दिवशीचे सकाळी साडेनऊचे दुपारी अडीच दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. या फुटेज संदर्भातील अहवाल आणि भिसे कुटुंबियांनी दिलेली तक्रार याचा अहवाल आम्ही ससून प्रशासनाकडे पाठवणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार
आम्हाला थेट याप्रकरणी गुन्हा दाखल करता येत नसल्याने, प्रशासनाचा जो निर्णय येईल, त्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली
जाईल. – सुनीता रोकडे ( वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अलंकार पोलिस ठाणे)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×