Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

ग्रामीण पोलिसांकडून ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त

marathinews24.com

पुणे – ‘कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. अभिवादन सोहळ्यानिमित्त होणाऱ्या गर्दीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे’, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.
‘काेरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. गुरुवारी (१ जानेवारी) अभिवादन सोहळ्यात राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील अनुयायी उपस्थिती लावणार आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

ग्रामीण-निमशहरी नागरिकांसाठी वरदान ठरतंय उपजिल्हा रुग्णालय इंदापूर – सविस्तर बातमी

गर्दीचे नियोजन, वाहतूक बदल तसेच अनुयायींची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे’, असे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.‘गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अभिवादन सोहळ्यास जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. वाहनतळ, वाहतूक बदलाबाबतचे नियोजन करण्यात आले. अग्निशमन दल, रुग्णवाहिका, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), बाॅम्बशोधक नाशक पथक (बीडीडीएस), शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तैनात असणार आहे’, असे त्यांनी नमूद केले.

पुणे ग्रामीण पाेलिसांचा बंदोबस्त

वरिष्ठ पोलीस अधिकारी – ३३

पोलीस अधिकारी – ३३२
पोलीस कर्मचारी – ३ हजार १०

गृहरक्षक दलाचे जवान – १ हजार ५००

राज्य राखीव पोलीस दल – ४ तुकड्या

अनुयायांसाठी वाहनतळ पार्किंग

राज्यासह देशभरातील अनुयायी खासगी गाड्यांमधून कोरेगाव भीमा येथे येणार आहेत. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. वक्फ बोर्ड येथील वाहनतळ, टोरँटो पार्किंग, इनामदार पार्किंग येथे ४०० बस लावण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वाहनतळाच्या परिसरात पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

अनुयायांसाठी पोलीस मदत केंद्र

‘कोरेगाव भीमा परिसरातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी ड्रोन कॅमेरे वापरण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी नजर गर्दीवर असणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस नियंत्रण कक्षाशी (कंट्रोल रुम) जोडण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षातून गर्दीचे नियोजन करुन बंदोबस्तावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येणार आहेत. अनुयायांसाठी जागोजागी पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ध्वनीवर्धकाकडून सूचना (पीए सिस्टीम) वापरण्यात येणार आहे. नगर रस्ता, पेरणे फाटा परिसरात गर्दीवर लक्ष ठेवण्यासाटी तात्पुुरते मनोरे (वाॅच टाॅवर) उभे करण्यात आले आहेत’, असे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×