Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

चेन स्नॅचिंग करणारे चोरटे २४ तासांत जेरबंद

ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडी

वानवडी पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – कामधंदा मिळत नसल्याने महिलेचा पाठलाग करून सोनसाखळी हिसकावून नेणाऱ्या दोघा दुचाकीस्वार चोरट्यांना वानवडी पोलिसांनी २४ तासांत अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाखांची सोनसाखळी, दुचाकी असा तीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. ही घटना ५ मार्चला सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास गंगा सॅटेलाईट सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली होती.जेसन उर्फ बन्नी नबेल के. लिंकनन (वय २५, रा. संकेत विहार कॉलनी, काळेपडळ, हडपसर, मूळ रा. बाराडी, जमशेदपूर, झारखंड) आणि हर्षओम उर्फ गोलू कुमार अमितकुमार शर्मा (वय २७) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

महिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या पापा शेखसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संतोषकुमारी यादव (वय ५८) या पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तिच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून नेली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी ७० ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, दया शेगर, महेश गाडवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, आशीष कांबळे, अमोल गायकवाड, गोपाल मदने, विष्णू सुतार, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे, विद्या चोरटले, अर्शद सय्यद यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×