Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Chandrakant Patil Drought Relief : दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी चंद्रकांत दादांचा अनोखा पुढाकार

Chandrakant Patil Drought Relief

समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीत धान्य उपलब्ध करून देणार

marathinews24.com

पुणे – Chandrakant Patil Drought Relief : राज्यातील दुष्काळग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अनोखा पुढाकार घेतला आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने कोथरूडमधील समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात कोथरुडकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

उद्योग व व्यावसायिक आस्थापनांनी सहभागी होण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

एल निनोचा प्रभाव आणि पावसातील तूट यामुळे राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, शासनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड मिळाल्यास दुष्काळग्रस्त नागरिकांना अधिक प्रभावीपणे मदत करता येईल, असा विश्वास चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

उपक्रमांतर्गत कोथरूडमधील स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण सोसायट्या आणि मदत करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी निधी संकलित करावा. या संकलित निधीतून समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. (Chandrakant Patil Drought Relief) कोविडच्या संकटात ज्या पद्धतीने लोकसहभागातून आपण एकत्रितपणे परिस्थितीवर मात केली, त्याचप्रमाणे दुष्काळाच्या संकटातही समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. शहरी भागातील नागरिकांनी दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी योगदान द्यावे. या सामाजिक कार्यासाठी समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×