Breking News
बळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा

महाविद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने ३ लाखांची फस‌वणूक

कोंढवा पोलिसांंकडून एकाविरुद्ध गुन्हा 

marathinews24.com

पुणे – अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. अतुल नंदा चासकर (रा. भोरवाडी, अवसरी खुर्द, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका पालकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पद्मावती भागात जुगार अड्ड्यावर छापा; भाजप पदाधिकारी ताब्यात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पालक कोंढव्यात राहायला आहेत. आरोपी चासकर याच्याशी त्यांची एका परिचितामार्फत ओळख झाली होती. बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर असलेल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात तक्रारदाराच्या मुलाला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष चासकर याने गेल्या वर्षी जुलै महिन्यात दाखविले होते. प्रवेशाच्या आमिषाने चासकरने त्यांच्याकडून वेळोवेळी दोन लाख ९८ हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर चासकरकडे तक्रारदाराने विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. तक्रारदाराच्या मुलाला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला नाही,तसेच रक्कमही दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव तपास करत आहेत.

महिलेच्या पर्समधून दागिने, रोकड लंपास

तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून ५३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, तसेच रोकड लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार मूळच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा गावातील आहे. गौरी-गणपतीचे साहित्य खरेदीसाठी त्या बहिणींसोबत तुळशीबागेत १० ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास आल्या होत्या.

तुळशीबागेतील एका दुकानात त्या गौरीचे मुखवटे पाहत होत्या. त्या वेळी गर्दीत चोरट्याने त्यांच्या पर्समधून ५३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा ऐवज लांबविला. खरेदी केल्यानंतर त्यांनी पर्सची तपासणी केली. तेव्हा पर्समधून ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. गेल्या काही दिवसांपासून तुळशीबागेत खरेदीसाठी येणाऱ्या महिलांकडील दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलीस हवालदार पडघमकर तपास करत आहेत.

प्रवासी ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरी

पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्यची घटना महापालिका भवन परिसरात घडली. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सदाशिव पेठेतील रेणुका स्वरुप शाळेजवळील एका सोसायटीत राहायला आहेत. रविवारी (११ ऑगस्ट) देहूरोड परिसरातील किवळे येथे राहणाऱ्या भावाकडे राखी पौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी निघाल्या होत्या. दुपारी दीडच्या सुमारास त्या बसमध्ये प्रवेश करत होत्या. गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७० हजारांचे मंगळसूत्र लांबविले. पोलीस हवालदार भापकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×