Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

बालचित्रपट महोत्सवाला ‘क्रांति ज्योती विद्यालय चित्रपटाने सुरुवात

बालचित्रपट महोत्सवाला ‘क्रांति ज्योती विद्यालय चित्रपटाने सुरुवात

संवाद’, कावरे आईस्क्रिम आयोजित चित्रपट प्रदर्शन

marathinews24.com

पुणे – संवाद पुणे आणि कावरे आईस्क्रिमतर्फे आयोजित बालचित्रपट महोत्सवाला शुक्रवारी (दि. १७) ‘क्रांति ज्योती विद्यालय’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने सुरुवात झाली. शालेय विद्यार्थी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आकाशात फुगे सोडून चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले. चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. महोत्सव दि. १७ ते २३ एप्रिल या कालावधीत सीटी प्राईड, कोथरूड येथे आयोजित केला आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबीराला पुण्यात प्रारंभ – सविस्तर बातमी 

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकार ल. म. कडू, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, ‘कर्मवीरायण’ चित्रपटाचे दिग्दर्शक धनंजय भावलेकर, कावरे आईस्क्रिमचे राजूशेठ कावरे, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, महोत्सवाच्या सूत्रधार निकिता मोघे, संयोजक केतकी महाजन-बोरकर, जान्हवी कावरे उपस्थित होते. गेल्या २६ वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी महोत्सवाचे विनामूल्य आयोजन करण्यात येत आहे.

महोत्सवाअंतर्गत १८ रोजी रणपती शिवराय, दि. १९ रोजी अभंग तुकाराम (दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर), दि. २० रोजी अवकारिका (दिग्दर्शक अरविंद भोसले), दि. २१ रोजी चिकीझिंग (दिग्दर्शक राजेंद्र बगाटे, वैभव कुलकर्णी), दि. २२ रोजी कर्मवीरायण (दिग्दर्शक धनंजय भावलेकर), दि. २३ रोजी ताजमहाल (दिग्दर्शक नियाज मुजावर) हे चित्रपट दाखविले जाणार आहेत.
ल. म. कडू म्हणाले, सातत्याने केवळ मुलांसाठी चित्रपट महोत्सव विनामूल्य आयोजित करणे सोपी गोष्ट नाही. महोत्सवाच्या निमित्ताने मुलांना सुंदर सिनेमे बघण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल संवाद, पुणेचे सुनील महाजन आणि कावरे आईस्क्रिमचे राजूशेठ कावरे यांचे अभिनंदन करायला हवे. तसेच संस्कृती बालगुडे म्हणाली, लहानपणापासून महोत्सवात अनेक चित्रपट बघण्याची संधी मिळाल्याने चित्रपट क्षेत्रात करिअर करण्यासाठी महोत्सवाचा खूप उपयोग झाला. मराठी चित्रपट पाहण्यासाठी पालक मुलांना घेऊन येत आहेत, त्या बद्दल पालकांचे अभिनंदन.

दिग्दर्शक धनंजय भावलेकर म्हणाले, सध्याच्या काळातील समाज माध्यमांचा वाढता प्रभाव बघता मराठी चित्रपटांना उभारी मिळण्यासाठी महोत्सव निश्चितच उपयोगी ठरतात. तसेच मुलांना आनंद मिळवून देण्यासाठी दरवर्षी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. भविष्यातही मुलांना चांगले चित्रपट पहायला मिळावेत यासाठी सहकार्य करू अशी ग्वाही जान्हवी कावरे यांनी दिली. तर सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती सांगितली. निकिता मोघे यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत राजूशेठ कावरे, जान्हवी कावरे यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×