Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

स्वामी चिंचोलीत विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा

स्वामी चिंचोलीत विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा

प्लास्टिकबंदी आणि ५० टक्के थकबाकीवरील करमाफीचा निर्णय

marathinews24.com

पुणे – ग्रामपंचायत स्वामी चिंचोली ( ता. दौंड) यांच्यावतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन विस्तार अधिकारी प्रशांत बगाडे व लालासाहेब जंजीरे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करवून घेतले. कापडी पिशवी प्रशिक्षणातील महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचेही लोकार्पण केले. वेळेत घरकुल बांधून पूर्ण करणार्‍या लाभार्थ्याचा सत्कार करण्यात आला.

देशासाठी गुरू तेग बहादुर जी यांचे बलिदान अविस्मरणीय : चंद्रकांत पाटील – सविस्तर बातमी 

विशेष ग्रामसभेत प्लास्टिकबंदी व निवासी मालमत्तावरील थकबाकीवरील ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला. यावेळी उपस्थितांना ग्रामपंचायतीच्या वतीने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. एकल महिलांचे बचतगट करण्यात आले. आतापर्यंत स्वामी चिंचोलीत एकूण 121 लखपती दीदी झाल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे यांनी दिली.

संविधान दिनाचे औचित्य साधत यावेळी गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच पूनम मदने, उपसरपंच प्रकाश होले, हिना शेख, पद्माकर कांबळे, परशुराम होले, चंद्रकांत होले, मच्छिंद्र मदने, अझहर शेख, शिवाजी शेंद्रे उपस्थित होते. यावेळी विविध मुद्द्यांवरती विस्तार प्रशांत बगाडे व लालासाहेब जंजीरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे यांनी केले, आभार मच्छिंद्र मदने यांनी मानले.

“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पन्नास टक्के करमाफी सवलतीचा जास्तीत जास्त ग्रामस्थांनी लाभ घ्यावा,व ग्रामपंचायतीस सहकार्य करावे.

पूनम मदने
सरपंच, स्वामी चिंचोली

घरकुल लाभार्थ्यांनी वेळेत घरकुले पूर्ण करावीत,जेणेकरून अभियान कालावधीत जास्तीत जास्त घरकुले पूर्ण होऊन गावाचा लौकिक वाढेल

-लालासाहेब जंजीरे
विस्तार अधिकारी
पंचायत समिती, दौंड

प्लास्टिकबंदी व कापडी पिशव्यांचा वापर अनिवार्य केल्याने पर्यावरण संरक्षण व महिला सक्षमीकरण हे दोन्ही हेतू साध्य होण्यास मदत होणार आहे

स्वाती लोंढे
ग्रामपंचायत अधिकारी
स्वामीचिंचोली

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×