Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

देशासाठी गुरू तेग बहादुर जी यांचे बलिदान अविस्मरणीय : चंद्रकांत पाटील

देशासाठी गुरू तेग बहादुर जी यांचे बलिदान अविस्मरणीय : चंद्रकांत पाटील

गुरू तेग बहादुर जी यांचा इतिहास ग्रंथालयांद्वारे समाजापर्यंत पोहोचविणार- चंद्रकांत पाटील; गुरू तेग बहादुर जी’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे – हिंदुस्तानवर सातत्याने होणारी परकीय आक्रमणे रोखण्यात देशातील मोजक्या राज्यांचे मोठे योगदान आहे. यात महाराष्ट्रासह पंजाबचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. गुरू तेग बहादुर जी यांचे बलिदान अविस्मरणीय असून त्यांच्या प्रयत्नातून धर्मावरचा आघात रोखला गेला. हा जाज्वल्य इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या कार्याची माहिती देणारे पुस्तक महत्वाचे ठरेल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

’असुरवन’ चित्रपटाच्या टीमने केली नाशिक येथे गोदा आरती – सविस्तर बातमी 

राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक ग्रंथालयात गुरू तेग बहादुर जी यांच्यावरील पुस्तक पोहोचविण्याचा तसेच नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील गुरू गोविंदसिंग अध्यासन केंद्राचे बळकटीकरण करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. सरहद, पुणेतर्फे गुरू तेग बहादुर जी यांच्या ३५०व्या शहीदी वर्षानिमित्त वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा तसेच ‘गुरू तेग बहादुर जी’ या पुस्तकाचे प्रकाशन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुनानक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संतसिंग मोखा होते तर गुरुद्वारा दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग साहनी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सरहद, पुणेचे संस्थापक संजय नहार, विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, डॉ. अमोल देवळेकर, शैलेश वाडेकर, अनुज नहार मंचावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आज (दि. २६) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पुस्तक माणसाच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य करते. आपल्या देशात ग्रंथांना गुरू मानले गेले आहे. ‘गुरू तेग बहादुर जी’ या पुस्तकाच्या माध्यमातून गुरू तेग बहादुर जी यांचे बलिदान जनसामान्यांपर्यंत पोहोचावे, त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी याविषयी सघन काम होणे आवश्यक आहे.

प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यात गुरू तेग बहादुर जी यांनी मोलाचे कार्य केले. त्यांच्या ३५०व्या शहीदी वर्षानिमित्त देशात येत्या वर्षभरात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत, त्यांचा प्रारंभ या पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या द्वारे शिखांचा इतिहास देशभरात पोहोचविण्यास मदत होईल.

चरणजित साहनी म्हणाले, गुरू तेग बहादुर जी यांच्या कार्याविषयी चित्रकथेच्या माध्यमातून सोप्या शब्दात या पुस्तकात माहिती देण्यात आली आहे. वर्षभरात शाळा-शाळांमध्ये हे पुस्तक वितरित केले जाईल, ज्या योगे गुरू तेग बहादुर जी यांचे कार्य जनसामन्यांच्या मनात रुजविले जाईल. विद्यार्थ्यांनी हा इतिहास जाणून घ्यावा असे सांगून साहनी म्हणाले गुरू तेग बहादुर जी यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित निबंध स्पर्धाही घेण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेशपाल जवळगे यांनी केले तर आभार अनुज नहार यांनी मानले. ना. चंद्रकांत पाटील यांचे स्वागत डॉ. अमोल देवळेकर, संतसिंग मोखा, चरणजितसिंग साहनी यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×