खिळवून ठेवणारा ‘क्रिकेट कटिंग गॅलरी’चा प्रवास; छायाचित्रांतून अनुभवला क्रिकेटचा सोनेरी इतिहास
Marathinews24.com
पुणे – क्रिकेटप्रेमींना आज एका आगळ्या वेगळ्या अनुभवाची पर्वणी पहायला मिळली. लहानपणापासून क्रिकेटप्रेमी असलेल्या पराग पनीकर यांनी छंद म्हणून क्रिकेट जगातात घडलेल्या विभिन्न घटना, महान क्रिकेटपटूंच्या घटना, संदर्भ आदींची वृत्तपत्रातील कात्रणे गोळा करून त्याचा संग्रह केला आहे. हा संग्रह सर्व सामान्य लोकांना पाहता यावा त्यातून प्रेरणा घेऊन छंद जोपासले जावेत, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पनीकर यांनी या कात्रण केलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिर येथे आहे.
सरकार तुम्हाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सक्षम; उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी
शिक्षणाने एम.सी.एस झालेल्या पराग पनीकर यांनी या गॅलरीमध्ये १९९६ पासून २०१२ पर्यंतची हजारो कात्रणे नीटपणे वर्गवारीनुसार लावलेली आहेत. क्रिकेटरची नावं, त्यांचे विक्रम, ऐतिहासिक सामने, विशेष क्षण, फोटो आणि मुलाखती यांचा या संग्रहात समावेश आहे. यात भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर आधारित दुर्मीळ माहितीचा खजिना आहे. कोणत्याही व्यावसायिक हेतूने नसून केवळ छंद म्हणून त्यांनी हा संग्रह तयार केला आहे. क्रिकेटच्या इतिहासात रस असलेल्यांसाठी ही गॅलरी म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे. पराग पनीकर यांचा हा छंद केवळ वैयक्तिक समाधानापुरता मर्यादित न राहता, अनेक तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरतो आहे.