व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई
marathinews24.com
पुणे – भर चौकात वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापणाऱ्या टोळक्याविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हडपसरमधील शेवकर वस्ती परिसरात ही घडली. तलवारीने केक कापतनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. शस्त्र बाळगणे, तसेच दहशत माजविल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चेन्नईतील समुद्रात महाराष्ट्रातील तरुणीसह दोघे बुडाले – सविस्तर बातमी
तलवार, कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्यांविरुद्ध यापूर्वी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या टोळक्याविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. १८ फेब्रुवारी रोजी वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड यांनी समाज माध्यमात प्रसारित झालेली चित्रफीत पाहिली. तलवारीने केक कापून दहशत माजवित असल्याचे दिसून आले. त्यानंतर वानवडी पोलिसांच्या पथकाने टोळक्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा हडपसर भागातील शेवकर वस्ती परिसरात १७ फेब्रुवारी रोजी तलवारीने केक कापून टोळक्याने केक कापून वाढदिवस साजरा केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली. तेव्हा टोळक्याने तलवारीने केक कापून दहशत माजविल्याचे उघडकीस आले.
त्यानंतर पोलिसांनी कारवाई करुन टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. भर चौकात तलवारीने वाढदिवस साजरा करुन वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळक्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब जाधव यांनी दिला आहे.
शस्त्र उगारून दहशत माजविणारे अटकेत
येरवड्यातील हुसेनशहा बाबा दर्गा चौकात तीक्ष्ण शस्त्रे उगारुन दहशत माजविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. गोट्या उर्फ प्रसन्न जयसिंग थूल (वय २५), गुब्या उर्फ हर्षद साळवे (वय २१, दोघे रा. सम्राट चौक, पंचशीलनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण येरवड्यातील हुसेनशहा बाबा दर्गा परिसरात राहायला आहे. आरोपी थूल आणि साळवे हे २० फेब्रुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हुसेनशहा बाबा दर्गा परिसातील चौकात आले. त्यांनी तीक्ष्ण शस्त्रे उगारुन दहशत माजविली. या भागातील नागिरकांना शस्त्राचा धाक दाखविला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. या घटनेची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी पसार झालेल्या आरोपींना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक मानेे तपास करत आहेत.
























