येवलेवाडी पोलिसांकडून तपास सुरू
marathinews24.com
पुणे – Crime News : कोंढव्यातील पिसोळी भागातील एका नियोजित रुग्णालयाच्या आवारात ठेवलेली दोन लाख रुपयांचा वायरचा बंडल चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काेंढवा मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर एका रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाच्या आवारात इलेक्ट्रीक वायरचे बंडल ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी दोन लाख रुपयांचे वायरचे बंडल चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक उमाकांत महाडिक तपास करत आहेत.
तीन वर्ष गुंगारा देणाऱ्या आरोपीला पकडले
गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले तीन वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट एकने ताब्यात घेतले. शिवाजीनगर भागात ही कारवाई करण्यात आली. अभिषेक संजय काळे (वय २७, रा. दांडेकर पुलाजवळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. १६ जुलै २०२३ रोजी दांडेकर पूल परिसरात काळे आणि साथीदारांनी तीन वर्षांपूर्वी एकाला मारहाण करुन दहशत माजविली होती. Crime News याप्रकरणी काळे आणि साथीदारांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर काळे पसार झाला होता. गेले तीन वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत होता.
काळे हा शिवाजीनगर भागातील माॅडर्न महाविद्यालयाजवळ थांबल्याची माहिती पोलीस हवालदार बाबा दांगडे, संतोष अनुसे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, सहायक निरीक्षक धीरज राऊत, बाबा दांगडे, संतोष अनुसे, संतोष नागरे, अतुल साळवे यांनी ही कारवाई केली.























