Crime News : पुण्यात दिवसाढवळ्या व्यावसायिकाला लुटले…

इलेक्ट्रीक दुकानातून वायरीचे बंडल, रोकड चोरी

४० लाख रूपयांची बॅग हिसकावून नेली

marathinews24.com

पुणेCrime News : बिल्डींगचे मटेरियल पुरविणार्‍या व्यावसायिकाला अडवून मोटारीतून आलेल्या टोळक्याने त्यांच्याकडील तब्बल ४० लाख रूपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली आहे. ही घटना १५ जुलैला सकाळी पावणेनउच्या सुमारास आंबेगावमधील बाबजी पेट्रोलपंप परिसरात घडली आहे. दिवसाढवळ्या लुटमारीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. अभिजीत विष्णू पवार (वय २८, रा. येडशी, धाराशिव) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा माग काढला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन चोरमले यांनी दिली आहे.

खूनाचा प्रयत्न करणारे टोळके गजाआड – कोंढवा पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पवार हे धाराशिवमधील रहिवाशी असून, बिल्डींगचे मटेरिल पुरविण्याचा त्यांचा व्यवसाय आहे १५ जुलैला ते ग्राहकांना पुरविलेल्या मालाची रोकड घेउन आंबेगावमधील बाबजी पेट्रोलपंपाजवळील एकाकडे मित्रासोबत पायी चालले होते. त्यावेळी मोटारीतून आलेल्या तिघाजणांनी त्यांना अडविले. त्यांच्याकडील रोकड असलेली ४० लाखांची बॅग हिसकावून चोरटे सुसाट वेगाने पसार झाले. घटनेनंतर पवार यांच्यासह मित्राने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत मोटारीतून आलेले चोरटे वेगाने निघून गेले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने धाव घेतली. आजूबाजूच्या आस्थापनामधील सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चोरटे व्यावसायिकाच्या मागावर असल्याची शक्यता

व्यावसायिक पवार हे ग्राहकांना विकलेल्या मालाची रोकड गोळा करतात. याची माहिती चोरट्यांना असू शकते. त्या माहितीच्या आधारेच त्यांनी प्लॅन करीत लुटमार केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजनुसार परिसरात ये-जा करणार्‍या शेकडो मोटार चालकांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे. त्याआधारेच आरोपींचा माग निघणार आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड घेउन पायी चालत जाणे हे धोक्याचे असतानाही, व्यावसायिकाने धोका का पत्करला असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोणी काळभोरमध्ये घरफोडी, साडेसहा लाखांचा ऐवज चोरीला

Crime News : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, मोबाइल, सोन्या-चांदीचे दागिने असा ६ लाख ६५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १२ ते १४ जुलै कालावधीत लोणी काळभोरमधील कदमवाक वस्ती परिसरातील पठारे वस्तीवर घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कदमवाक वस्तीवर राहायला आहेत. १२ ते १४ जुलै कालावधीत ते कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील २५ हजारांची रोकड, दागिने, मोबाइल असा ६ लाख ६५ हजारांचा ऐवज चोरून नेला. गावाहून आल्यांनतर तक्रारदाराला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर तपास करीत आहेत.

बोपोडीत घरफोडी करून दागिने चोरले

Crime News : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३३ हजारांचे दागिने चोरून नेल्याची घटना १४ जुलैला बोपोडीतील मानाजीबाग परिसरातील भोईटे चाळीत घडली आहे. याप्रकरणी महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार ढवळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×