Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

Crime News : पुण्यात व्यावसायिकाची ४८ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणेCrime News : स्वस्तात तांबे विक्रीच्या आमिषाने व्यावसायिकाची ४८ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे शहरात चोरट्यांचा उच्छाद सुरूच – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक तरुण पर्वती भागात राहायला आहे. एप्रिल महिन्यात त्यांनी संकेतस्थळावर स्वस्तात दक्षिण आफ्रिकेतून तांबे मिळवून देऊ, असा संदेश पाहिला होता. या संदेशात संपर्क क्रमांक देण्यात आला होता. त्यानंतर व्यावसायिकाने संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर व्यावसायिकाला २५ टन तांबे (काॅपर स्कॅप) देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी जाळ्यात ओढले. व्यावसायिकाला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. मे महिन्यापर्यंत व्यावसायिकाने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात ४८ लाख ७२ हजार रुपये जमा केले.

सायबर चोरट्यांनी त्याच्या मोबाइल क्रमांकावर जहाजाने तांबे पाठवित असल्याचे सांगितले होते. प्रवास खर्चाची बनावट बिले सायबर चोरट्यांनी त्याला पाठविली. जहाजाद्वारे पाठविण्यात येणारा माल न पोहचल्याने व्यावसायिक तरुणाने सायबर चोरट्यांच्य मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड तपास करत आहेत.

व्यावसायिक महिलेची २५ लाखांची फसवणूक

Crime News : स्वस्तात कपडे देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिक महिलेची २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अर्जुन आणि हर्ष मेहता नावाच्या आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक महिलेची आरोपींची ओळख झाली होती. त्या वेळी आरोपींनी महिलेला महिलांचे कपडे स्वस्तात उपलब्ध करुन देतो, असे सांगितले होते.

आरोपीना महिलेने रोख स्वरुपात २५ लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतर आरोपींनी महिलेला कपडे मिळवून दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सिसाळ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×