Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

Crime News : पिस्तूलाचा धाक दाखवून दहशत माजवणारा जेरबंद

Crime News : पिस्तूलाचा धाक दाखवून दहशत माजवणारा जेरबंद

विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे Crime News : पिस्तूलाचा धाक दाखवत लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून एक विदेशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा सुमारे ८५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.राज ऊर्फ सोन्या रविंद्र भवार (रा. भिमनगर, विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

मौजमजेसाठी उच्च शिक्षिताकडून दुचाकींची चोरी – सविस्तर बातमी 

विश्रांतवाडी पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत असताना अंमलदार संपत भोसले यांना सराईत गुन्हेगार धानोरी रोडवर पिस्तुल घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली. परिसरातून येणाऱ्या-जाणाऱ्यांना तो धमकावत आहे. मी विश्रांतवाडीचा भाई आहे, मला जो नडेल त्याला जिवंत सोडणार नाही असे म्हणत त्याने परिसरात दहशत माजवली होती. यापक्ररणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपी राज भवार याला ताब्यात घेतले. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस अंमलदारांनी शिताफीने पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले.

सराईताकडून विदेशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडे आणखी चौकशी केली जात आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, उपनिरीक्षक महेश भोसले, बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, विशाल गाडे, धवल लोणकर, स्वप्नील कांबळे, अक्षय चपटे, किशोर भुसारे, प्रमोद जाधव, होना साबळे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×