सारसबाग परिसरात पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – Crime News : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्यानंतर कारागृहातून जामीन मिळवून बाहेर आलेल्या गुंडाकडून स्वारगेट पोलिसांनी पिस्तूल जप्त केले. सारसबाग परिसरात ही कारवाई केली. नरेश उर्फ नब्या सचिन दिवटे (वय २२, रा. सर्व्हे क्रमांक १३३, दांडेकर पूल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दिवटेला कारागृहात असताना न्यायालयाकडून जामीन मिळविला. त्यानंतर तो पिस्तूल बाळगून फिरत असल्याप्रकरणी मिळून आला.
सारथी संस्थेच्या कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी
स्वारगेट पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस हवालदार कुंदन शिंदे आणि दिनेश भांदुर्गे हे सारसबाग परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी दिवटे हा आदमबागेजवळील रस्त्यावर थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची त्यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या कंबरेला पिस्तूल खोचल्याचे आढळून आले. दिवटे याच्याकडून पिस्तुलासह काडतूस जप्त केले आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दिवटे याच्याविरुद्ध सहकारनगर आणि पर्वती पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दंगल, गंभीर दुखापत, लूटमार, तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन वर्षांपूर्वी त्याच्याविरुद्ध मकोका कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत कारागृहातून तो जामीन मिळवून बाहेर आला. त्याचा पिस्तूल बाळगण्याचा उद्देश काय ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. न्यायालायने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, भारमळ, सहायक निरीक्षक अभिजित पाटील, उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, संजय भापकर, कुंदन शिंदे, दिनेश भांदुर्गे, श्रीधर पाटील, सागर केकाण, राहुल तांबे, विक्रम सावंत, रमेश चव्हाण, विकास केद्रे यांनी केली.
पैशांच्या वादातून तरुणावर शस्त्राने वार
Crime News : हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना पुणे स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सचिन शिवाजी माने (वय ३०) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लंब्या नाव असलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माने याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने आणि आरोपी लंब्या हे पुणे स्टेशन परिसरात राहायला आहेत. दोघेजण मजुरी करण्यासाठी पुण्यात आले होते. मानेने आरोपीला ४०० रुपये उसने दिले होते. शुक्रवारी (२७ जून) रात्री मानेने आरोपीला पैसे मागितले. त्या कारणावरुन माने आणि आरोपींमध्ये वाद झाला. पुणे रेल्वे स्थानक परिसरातील पार्सल ऑफिसजवळ आरोपीने मानेवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार तपास करत आहेत.
हडपसरमध्ये घरफोडी, ४ लाखांचा ऐवज लंपास
Crime News : फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ४ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला हडपसर भागातील साडेसतरा नळी परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून ४ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस उपनिरीक्षक मुलाणी तपास करत आहेत. तसेच एनडीए परिसरातील खडकवाडी गावातील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ हजार रुपये लांबविले. याबाबत एकाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार एनडीए-खडकवासला रस्त्यावरील खडकवाडी गावात राहायला आहेत. गुरुवारी (२७ जून) तरुण, त्याचे आई-वडील घरात झोपले होते. चोरट्याने खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश केला. कपाटातील दोन हजार रुपयांची रोकड चोरुन नेले