Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुण्यात मध्यवर्ती भागात गुन्हेगारांचा अड्डा

पीएमपीएल प्रवासी महिलांचे दीड लाखांचे दागिने लांबविले

डेक्कन नदीपात्र, नळस्टॉप परिसरात दम मारो दम

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती भागात गुन्हेगारांचा वावर वाढला असून, दरदिवशी रात्रभर वादविवाद, आरडा-ओरड गोंधळामुळे परिसरातील नागरिकांना अक्षरशः मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः डेक्कन नदीपात्रातील रात्रभर सुरू असलेली चौपाटी, नळस्टॉप परिसरातील मद्यधुंद तरूणाईचा धांगडधिंगा पोलिसांना दिसेनासा झाला आहे. मागील अनेक महिन्यांपासून संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत ना गुन्हे शाखेने कोम्बिंग ऑपरेशन राबवले, ना डेक्कन पोलिसांनी खबरदारी घेतली. त्यामुळे गुन्हेगारांचा राबता वाढला असून, पोलिसांकडून गुन्हेगारांचे कोम्बिंग, रात्रपाळीचे पेट्रोलिंग कधी वाढवले जाणार, अशी विचारणा स्थानिक नागरिक करीत आहेत.

पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस हायजॅकचा प्रयत्न – सविस्तर बातमी

मध्यवर्ती डेक्कन नदीपात्रात दरदिवशी रात्रभर सुरू असलेल्या चौपटीवर पार्टी करण्यासाठी तरूण तरूणाईची वाढती गर्दी वाढली आहे. त्यातच गुन्हेगारीत असलेल्या अनेकांचा वावर परिसरात कायमस्वरूपी असल्याचे दिसून आले. मात्र, याकडे सर्रासपणे दुर्लक्ष का केले जात आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपी, कारागृहातून जामिनावर बाहेर आलेले गुन्हेगार, मद्यधुंद तरूणाई, ड्रग्जच्या आहारी गेलेले काही गर्दुले बिनधास्तपणे नदीपात्र परिसरात फिरत आहेत. त्यामुळे रात्री उशिरा कामावरून सुटणार्‍या महिलांसह तरूणींच्या मनामध्ये सततची धास्ती निर्माण होत आहे. त्यातच १९ एप्रिलला डेक्कन नदीपात्रात तरूणाच्या खूनाची घटना उघडकीस आली होती. त्या खूनाची उकल करण्यात आली आहे. मात्र, अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून दक्षतापुर्वक कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्यरात्रीनंतर पोलीस पेट्रोलिंग व्हॅन उभी करणे, नाईट पेट्रोलिंगला प्राधान्य देणे, टवाळगिरी करणार्‍यांना जाब विचारणे, पोलिसी खाक्या दाखवण्यासाठी कोणाच्या आदेशाची वाट पाहावी लागत आहे.

ड्रग्ज तस्करांसह तरूणाईचा दम मारो दम जोरात

नळस्टॉप परिसरात मध्यरात्रीनंतर सुरू होणारे उपहारगृहे कायदा सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत. मद्यधुंद तरूणाई, ड्रग्जचे सेवन केलेली मुल-मुली, सिगारेटच्या धुरात हरवेला परिसर दिवसेंदिवस कायदा सुव्यवस्थेची घडी बिघडवण्यासाठी सज्ज होत आहे. मात्र, तरीही संबंधित कोथरूड आणि डेक्कन पोलीस याकडे अर्थपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. आरडाओरड करणार्‍यांची साधी विचारपूसही केली जात नाही, गांजा, सिगारेट, मेफेड्रॉन तस्करांसह अमली पदार्थांचे सेवनही याच भागात वाढल्याचे दिसून आले आहे. त्यालाही पोलिसांनी मुकसंमती दिली असल्यामुळे गुन्हेगारांसह टवाळखोरी करणार्‍या तरूणाईचे फावले आहे. नाईट लाईफच्या नावाखाली तरूणाईकडून घातला जाणारा धांगडधिंगा पोलिसांना मान्य आहे का, रात्रभर अमली पदार्थांचे होणारे सेवन पोलिसांना मान्य आहे का, ड्रग्ज पेडलरांचा वावर अन तस्करीचे रॅकेट गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांना मानवंदना देणारे आहे का, स्थानिकांना रात्रभर वेठीस धरणार्‍या तरूणाईला आवर घालण्याचे पोलिसांना वावडे आहे, या सारख्या असंख्य प्रश्नांना पोलिसांनी सोयीस्कर बगल दिली आहे.

ना गुन्हे शाखा, ना स्थानिक पोलीस

पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेत रात्रपाळीला कार्यरत असलेल्या बहुतांश अधिकारी कर्मचार्‍यांकडून नावापुरती नाईट शिफ्ट केली जाते. मागील काही महिन्यांत कोणीही कोम्बिंग ऑपरेशन राबवले नाही. खून, खूनाचा प्रयत्न, वादविवाद, आरडा-ओरड, गोंधळाच्या घटना डेक्कन, नळस्टॉप परिसरात घडल्या आहेत. मात्र, ना गुन्हे शाखा, ना स्थानिक पोलिसांकडून याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे नागरिकांनो तुमची सुरक्षितता तुम्हाला करावी लागणार आहे. दरम्यान, पोलिसांनी नाईट पेट्रोलिंगला प्रामाणिकपणे प्राधान्य दिल्यास, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न उद्भवणार नाहीत. मात्र, घटना घडल्यानंतर पोलिसांना जाग येत असल्यामुळे नेमकी जबाबदारी कोणाची असा प्रश्न निर्माण होत आहे.

लोकप्रतिनिधींची भूमिका महत्वाची

शहराच्या मध्यभागात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे किमान लोकप्रतिनिधीही लक्ष देणे गरजेचे आहे. हद्दीतील शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपलेली योगदान महत्वाचे असून, यासाठी तुम्ही स्थानिक पोलिसांना जाब विचारणा की नाही, तुमच्या हद्दीतील गुन्हेगारी वाढत असतानाही लक्ष देणार का नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. नागरिकांनो तुम्हीही याचा जाब पोलिसांना विचारावा. आपल्या सुरक्षिततेची जाणीव निर्माण करावी.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×