पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस हायजॅकचा प्रयत्न

पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस हायजॅकचा प्रयत्न

संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती टळली

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती डेक्कन परिसरात शनिवारी दुपारी मोठा थरार पाहायला मिळाला. एका मद्यधुंद व्यक्तीने डेक्कन येथील पीएमपी बस स्टँडवरून पीएमपी बस पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली. महाराष्ट्र बँक चौकाजवळून सुरू झालेला हा प्रकार गुडलक चौक, कारंजी मार्गे पुन्हा डेक्कन बस स्थानकापर्यंत पोहोचला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

महावितरणच्या मान्सूनपूर्व दुरूस्तीचे पूर्वनियोजित कामे सकाळच्या सत्रात होणार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलाकार कट्ट्यावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे त्या भागात पोलिस आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून संबंधित बस अडवली आणि चालकाला ताब्यात घेतले. पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. घटनेमुळे २०१२ मधील कुप्रसिद्ध संतोष माने प्रकरणाची आठवण ताजी झाली. २५ जानेवारी २०१२ रोजी संतोष माने याने स्वारगेट येथून एसटी बस पळवून शहरात भीषण हल्ला केला होता. त्या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला होता, तर २७ जण जखमी झाले होते. तसेच अनेक वाहनांचेही मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने, डेक्कनमधील ताज्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर मानला जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×