Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर देहू-आळंदीत गर्दी टाळावी; वारकऱ्यांनी पुणे शहरातून पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून निवासासह आवश्यक सुविधांची व्यवस्था

marathinews24.com

पुणे – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसामुळे देहू-आळंदी परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी व भाविकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे केलेले आवाहन लक्षात घेऊन, शिवसेना नेत्या व मा. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही वारकऱ्यांनी सध्या देहू व आळंदी येथे गर्दी टाळावी आणि शक्यतो पुणे शहरातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

आषाढी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने कृष्णा आणि गोदावरी खोऱ्यातील सुयोग्य जलव्यवस्थापन करावे – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – सविस्तर बातमी

आज (दि. ७) जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूहून, तर उद्या (दि. ८) दुपारी ३ वाजता आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. मात्र, इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पूल, रस्ते आणि वाहतूक विस्कळीत झाली असून, वॉटरहाऊस, दर्शनबारी, मोबाइल शौचालये आणि अन्य व्यवस्था पुरामुळे बाधित झाल्याने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे कठीण झाले आहे.

आळंदीतील पालखी प्रस्थान सोहळा केवळ निमंत्रित मानकरी, मानाचे खांदेकरी, कर्मचारी, आरोग्य व स्वच्छता कर्मचारी आणि पोलिस अशा एकूण १,६६० जणांच्या मर्यादित उपस्थितीत होणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच पुण्यातील संगमवाडी येथेही वारकऱ्यांनी गर्दी टाळावी, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

सध्याच्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी आपत्कालीन उपाययोजना राबवल्या आहेत. महापालिकांच्या शाळांमध्ये वारकऱ्यांसाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात आली असून, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज, वैद्यकीय मदत, अन्नाची व्यवस्था तसेच आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, आरोग्य विभाग, स्वच्छता कर्मचारी आणि इतर यंत्रणा सतत कार्यरत असून, वारकऱ्यांनी सुरक्षित स्थळी थांबून या सुविधांचा लाभ घ्यावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×