Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

बस प्रवाशाकडून पावणे आठ कोटींचे क्रिस्टल मेथ जप्त

विदेशी महिला अटकेत; डीआरआयची मोठी कारवाई

marathinews24.com

पुणे – बस प्रवाशाकडून पावणे आठ कोटींचे क्रिस्टल मेथ जप्त – डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) आणि सीमा शुल्क विभाग (कस्टम) पुणे यांनी केलेल्या संयुक्तीक कारवाईत दिल्लीहून बेंगळुरूकडे बसने प्रवास करत असताना अमली पदार्थाची तस्करी करणार्‍या विदेशी महिलेला अटक केली. तिच्या ताब्यातून तब्बल ३ किलो ८१५ ग्रॅम हा क्रिस्टल मेथ हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ७ कोटी ६३ लाख रूपये आहे.

सरकार ऑटो, कॅब चालक-मालकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी कटिबद्ध-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – सविस्तर बातमी

डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एक विदेशी महिला ही त्याच्या सामानात बेकायदेशिररित्या बंदी असलेला अमंली पदार्थ घेऊन चालली असल्यासची माहिती डीआरआच्या पुणे पथकाला मिळाली होती. त्यानुसार डीआरआय आणि कस्टम विभागाने मुंबई- बंगळुरू महामार्गावार सापळा लावला मुंबई-बंगळुरू महामार्गावर संशयित बस पथकाने आडवून संबंधीत महिलेच्या सामानाजी पथकाने तपासणी केली. मात्र सुरवातील त्यांना बॅगेत काही आढळून आले नाही. बसची पुर्ण तपासणी केल्यानंतर तिने तिची दुसरी बॅग बसच्या मागील बाजूला लपवून ठेवल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. दुसरी बॅग तपासल्यानंतर त्या बॅगमध्ये कपडे होते. त्यातील सहा सलवार सुटमध्ये विशेष कागदी फळ्या लावून पॉलिथिनच्या अस्तरात क्रिस्टल मेथ लपविल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तपासात हा पदार्थ क्रिस्टल मेथ असल्याचे निष्पन्न झाले.

महिलेकडून ७ कोटी ६३ लाखांचा ३ किलो ८१५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आला. क्रिस्टल मेथ जप्त करून संशयित महिलेला एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे डीआरआयने कळवले आहे. क्रिस्टल मेथ हा एक अत्यंत घातक अमली पदार्थ आहे. याचे वैज्ञानिक नाव मेथॅम्फेटामाइन आहे. हे एक कृत्रिम रासायनिक औषध असून, उत्तेजक म्हणून मेंदू आणि मज्जासंस्थेवर तीव्र परिणाम करते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×