सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे व्यावसायिकाला साडेचार कोटी रुपये मिळाले

पुण्यात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

पोलाद पुरवठ्याच्या आमिषाने फसवणूक

marathinews24.com

पुणे – सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सायबर चोरटे वेगवेगळी आमिषे दाखवून नागरिकांची दररोज लाखो रुपयांची फसवणूक करत आहेत. सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाची साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केली. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या तत्परतेमुळे बांधकाम व्यावसायिकाला साडेचार कोटी रुपये परत मिळाले.

व्यावसायिक स्पर्धेतून उपाहारगृह चालकासह दोघांवर शस्त्राने वार – सविस्तर बातमी 

शहरातील एका व्यावसायिकाला बांधकामसाठी पोलाद हवे होते. व्यावसायिकाने संकेतस्थळावर पोलाद विक्री व्यवसायाबाबतची माहिती घेतली. पोलाद पुरवठा करणाऱ्या व्यवासायिकाची माहिती घेत असताना त्यांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. राजस्थानातून बोलत असून, पोलाद पुरवठा करण्याचा व्यवसाय असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. पोलाद पुण्यात पाठविण्यासाठी पहिले पैसे पाठवावे लागतील, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर एका मध्यस्थाने दोन बँक खात्याचे क्रमांक व्यावसायिकाला पाठविले. त्यानुसार व्यावसायिकाने बँक खात्यात दोन कोटी २७ लाख रुपेय, तसेच दुसऱ्या बँक खात्यात दोन कोटी २७ लाख रुपये पाठविले.

चोरट्यांच्या खात्यात व्यावसायिकाने एकूण मिळून चार कोटी ५४ लाख रुपये भरले. चोरट्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केल्यानंतर त्यांनी मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने त्वरीत ऑनलाइन पद्धतीने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिसांकडे तक्रार झाल्यानंतर सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरु केला. दोन बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. खातेधारकांना याबाबतची माहिती नव्हती. पोलिसांनी बँकेला संबंधित खात्यात जमा झालेली रक्कम अन्य बँक खात्यात वर्ग करु नये, अशी विनंती केली. ज्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आलेे होते. त्या बँक खातेदारांना पैसे व्यावसायिकाच्या खात्यात आरटीजीएस सुविधेद्वारे पैसे पुन्हा जमा करण्यास सांगितले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिली. पोलिसांच्या तत्परतेमुळे व्यावसायिकाचे पैसे मिळाले.व्यावसायिकाने पोलिसांचे मनोमन आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×