Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

सायबर चोरट्यांकडून ४३ लाखांची फसवणूक

कस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांची ४३ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विवाह समारंभात वधू पक्षाकडील ६ लाखांचे दागिने लंपास – सविस्तर बातमी 

तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी पाठविला होता. चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात आठ लाख ५७ हजार रुपये जमा केले. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. अशाच पद्धतीने बोपोडी भागातील एका तक्रारदाराची सायबर चोरट्यांनी ११ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ५५ वर्षीय तक्रारदाराने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण गायकवाड तपास करत आहेत.

सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची २० लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक केली. तक्रारदार महिला मगरपट्टा सिटी भागात राहायला असून, त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करत आहेत. कोंढवा भागातील एकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी २ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक खराडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×