Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

सायबर चोरट्यांनी पुणेकरांना घेरले

कस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

जेष्ठ महिलेला ३५ लाखांचा गंडा; सदाशिव पेठेतील घटना

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांनी पुणेकरांना अक्षरशः वेठीस धरले असून, दरदिवशी लाखो रूपयांचा ऐवजाची ऑनलाईन लुटमार केली जात आहे. अर्धवेळ नोकरी, गॅस तोडण्याची धमकी, गुन्हा दाखल असल्याची बतावणी करीत फसवणूक केली जात आहे. बँकखाते तपासणीच्या नावाखाली गोपनीय माहिती विचारून आर्थिंक फसवणूक केली जात आहे. अशा घटनांमुळे नागरिक हतबल झाले असून, आरोपींच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली जात आहे.

बंडगार्डन रस्त्यावरील सराफी पेढीत चोरी – सविस्तर बातमी

शहरातील मध्यवर्ती सदाशिव पेठेत राहणार्‍या ७० वर्षीय महिलेला सायबर चोरट्यांनी तब्बल ३५ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना ११ ते १४ नोव्हेंबरला घडली असून, याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर चोरट्यांनी मनी लॉड्रींगमध्ये तक्रारदार महिलेचे आधार कार्ड वापरल्याची बतावणी केली. त्यानंतर त्यांचे बँकखाते तपासणीसाठी ताब्यात घेत ऑनलाईनरित्या ३५ लाख रूपये वर्ग करून फसवणूक केली आहे. यासंदर्भात मुंबईत तक्रार दाखल असल्याचेही बतावणी सायबर चोरट्यांनी केली. त्यानंतर त्यांचे बँकखाते तपासणीच्या नावाखाली घेउन ऑनलाईनरित्या गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे तपास करीत आहेत.

एफडीचे पैसे देण्याच्या नावाखाली जेष्ठ महिलेला लुटले

बँकेतील एफडीचे पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी मुंढव्यातील ७२ वर्षीय महिलेला ४ लाख ७५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ३ नोव्हेंबरला घडली असून, याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेने एफडी तोडण्यासाठी गुगलवर संबंधित बँकेचा क्रमांक शोधला होता. संबंधित मोबाइल क्रमांकावर फोन केला असता, सायबर चोरट्यांनी त्यांना पैसे मिळवून देण्याची बतावणी केली. जेष्ठ महिलेचा विश्वास संपादित केल्यानंतर त्यांच्या बँकखात्याचा तपशील घेतला. पावणेपाच लाख रूपये स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेत फसवणूक केली. पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×