Breking News
Constitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्ला

Daund Drought Situation : दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी विभागाचा वाळकीत दौरा

Daund Drought Situation

शेतकऱ्यांशी संवाद साधत पंचनामे व उपाययोजनांबाबत दिल्या सूचना

marathinews24.com

पुणे – Daund Drought Situation : दौंड तालुक्यातील वाळकी परिसरातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी वैभव तांबे व त्यांच्या पथकाने वाळकी येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजना, पंचनाम्यांची प्रक्रिया आणि शासनस्तरावर सुरू असलेल्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.

नानगाव येथे खरीप हंगाम दुष्काळ पंचनामा बाबत जनजागृती – सविस्तर बातमी 

वाळकी परिसरात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. संभाव्य उपाययोजना कोणत्या असतील, पंचनाम्यांच्या प्रक्रियेत आवश्यक असणारी कागदपत्रे तसेच शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी शासन स्तरावरील नियोजनाबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर योग्य मार्ग काढण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे तांबे यांनी सांगितले. कृषी विभागाच्या या भेटीमुळे शेतकऱ्यांना संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळाले. Daund Drought Situation यावेळी पोलीस पाटील निवृत्ती थोरात, सरपंच, माजी उपसरपंच, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×