Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

कुंडेश्वर अपघातातील मृत्यू अत्यंत वेदनादायी – डॉ. नीलम गोऱ्हे

कुंडेश्वर अपघातातील मृत्यू अत्यंत वेदनादायी - डॉ. नीलम गोऱ्हे

राजकारण बाजूला ठेवून पीडित कुटुंबांना मदत करणे हेच आपले कर्तव्य

marathinews24.com

पुणे – खेड तालुक्यात आज सकाळी कुंडेश्वर देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत १० महिलांचा जागीच मृत्यू झाला असून २९ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना खेड तालुक्यातील आणि परिसरातील पाच वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे समजते. या महिला यावेळी अतिशय भक्तीमध्ये दंग होऊन देवाची गाणी म्हणत कुंडेश्वर मंदिर दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला.

राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ; क्विंटलमागे १७० रुपये मिळणार – सविस्तर बातमी 

विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या घटनेवर तीव्र शोक व्यक्त करताना म्हटले, “दर्शनाच्या पवित्र हेतूने निघालेल्या भगिनींवर मृत्यूचा आघात होणे अत्यंत वेदनादायी आहे. या क्षणी राजकारण बाजूला ठेवून पीडित कुटुंबांना मदत करणे हेच आपले कर्तव्य आहे. डॉ. गोऱ्हे यांनी प्रशासनाला तातडीने मृत व जखमींची संपूर्ण यादी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले, जेणेकरून नातेवाईकांना माहिती मिळेल. दरम्यान, पोलीस, वैद्यकीय पथक आणि स्थानिक मदतगट घटनास्थळी बचावकार्य करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×