दिल्ली विजय आणि पानिपत बदला विजयसोहळा उत्साहात संपन्न

दिल्ली विजय आणि पानिपत बदला विजयसोहळा उत्साहात संपन्न

मराठ्यांच्या शौर्य, पराक्रम आणि ऐतिहासिक विजयाची स्मृती जागवणारा सोहळा

marathinews24.com

पुणे – भारत इतिहास संशोधक मंडळ व श्री देवदेवेश्वर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिल्ली विजय आणि पानिपत बदला विजय सोहळा’ मंगळवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात व गौरवशाली वातावरणात संपन्न झाला. मराठ्यांच्या शौर्य, पराक्रम आणि ऐतिहासिक विजयाची स्मृती जागवणारा हा सोहळा इतिहास प्रेमींसाठी प्रेरणादायी ठरला.

महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचे राज्यव्यापी सेफ्टी ऑडिट; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन – सविस्तर बातमी  

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण केले तसेच माधवराव पेशवे, महादजी शिंदे व तुकोजी होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश भागवत यांनी केले. यावेळी व्यासपीठावर एअर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक (निवृत्त), एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), पांडुरंग बलकवडे, सरकार उत्तमराव शिंदे , दकुमार निकम, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

एअर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक (निवृत्त) आणि एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच पानिपत शौर्यदिनाचा कार्यक्रम महादजी शिंदे छत्री, वानवडी (पुणे) येथे गेली आठ वर्षे सातत्याने आयोजित केला जात असून या उपक्रमाला महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल उत्तमराव शिंदे सरकार यांचा आणि पांडुरंग बलकवडे, पुष्करसिंह पेशवे, अभिमन्यू होळकर, गुरुड रणजितसंह यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे सरकारचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख अतिथी एअर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक यांनी आपल्या मनोगतात मराठ्यांच्या रणनिती, शिस्त आणि राष्ट्रभक्तीचा गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले यांनी पानिपतनंतरच्या मराठा विजयाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करत हा विजय केवळ लष्करी नसून स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा विजय असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश भागवत यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुप्रसाद कानिटकर यांनी केले आणि नंदकुमार निकम यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×