Breking News
अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ग्रीन सोल्युशन्सतर्फे जीवनगौरव पुरस्कारकृतज्ञ भावनेची जोड देत प्रसाद नगरकर यांनी आई-वडिलांना भेट दिली आलिशान ‘मर्सिडीज-मेबॅक’दैनिक प्रभातचे छायाचित्रकार संदीप घोडके यांचे निधनवारकरी संप्रदयाचा अपमान, विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यातहल्ल्याची १० महिन्यांपुर्वी तयारी, ५ आरोपी अटकेतनागरिकांना ऑनलाईन सेवा विहीत वेळेत उपलब्ध करुन द्याव्यातसिंधुदुर्गात देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकारसमाज कल्याण विभागाच्या विविध योजना वंचितांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावीचांगल्या परताव्याचे आमिष पडले ५ लाखांनाआंबेगावात घरफोडी, रोकडसह दागिने चोरीला

पुण्यात डिलिव्हरी बॉयला पिस्तूल लावून लुटले

पुणे रेल्वे स्टेशनमधील घटना ६९ लाख ७१ हजारांचा ऐवज चोरून नेला

marathinews24.com

पुणे – सोन्याचे दागिने जमा करण्यासाठी मुंबईतुन पुण्यात आलेल्या डिलिव्हरी बॉयच्या कमेरला पिस्तूल लावून त्याच्याकडील असलेले दागिन्यांचे पार्सल दोघांनी जबरदस्तीने चोरून नेले. पार्सलमध्ये तब्बल ६९ लाख ७० हजार ३६८ रुपयांच्या सोन्याचा ऐवज. याबाबत अंबे एक्स्प्रेस लॉजेस्टिक कंपनीचे व्यवस्थापक प्रथमेश माने (वय २८, रा. अंधेरी) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनसमोर बुधवारी (दि. ११) सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली आहे.

जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबे एक्स्प्रेस लॉजेस्टिक कंपनी ही जय मनोहरलाल कोठारी आणि मनोहरलाल भवरलाल कोठारी यांच्या मालकीची आहे. संबंधित कंपनी सोने, चांदी व डायमंड ज्वेलरी पोहोचवण्याचे काम करते. मुंबईतून कंपनीकडे ६९ लाख ७० हजार ३६८ रुपयांचे सोन्याचे दागिने असलेले ८ पार्सल पुण्यातील शाखेत पोहचवण्याचे काम तरुणाला देण्यात आले होते. कंपनीचा कर्मचारी हे पार्सल घेऊन मुंबईहून रेल्वेने पुण्यात आला.

तो पुणे रेल्वे स्टेशनला उतरून स्टेशन बाहेर आल्यानंतर दोघा जणांनी त्याला पिस्तूलाचा धाक दाखवला. मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील ८ पार्सल जबरदस्तीने काढून घेतले. घाबरलेल्या कर्मचाऱ्याने ही माहिती मॅनेजर प्रथमेश माने यांना फोन करून कळवली. माने यांनी तातडीने पुण्यात येत, बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी सांगितले, पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीमध्ये दोघेजण कर्मचाऱ्याच्या शेजारी दिसत आहेत. त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला दिसून येत आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×