Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

विबग्योर शाळेतील विद्यार्थ्यांना अग्निशमन दलाकडून प्रात्यक्षिके

आपत्कालीन परिस्थितीत काय करावे याचे प्रात्यक्षिक

marathinews24.com

पुणे – अग्निशमन दलाकडे आग व आपत्कालीन परिस्थितीत काय करावे व काय करु नये याबाबत शहर परिसरात शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, हॉटेल, मॉल, मल्टिप्लेक्स, सरकारी आस्थापना व विविध निवासी आणि व्यावसायिक इमारतींमध्ये जनजागृतीपर विविध व्याख्याने तसेच प्रात्यक्षिक करुन दाखविले जातात. या अशा जनजागृतीपर कार्यामुळे प्राथमिक स्तरावर आग वा आपत्तीचा सामना कसा करावा याबाबत माहिती देण्यात येते आणि शहरातील नागरिक यामुळे जागरुक होत आग वा आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलास सहकार्य करत मदत करीत असतात.

सैनिक कल्याण विभागात कारगिल विजय दिवसाचे आयोजन – सविस्तर बातमी

याप्रकारे आज सकाळी विगब्योर शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्र येथे अशाप्रकारे अग्निशमन विषयावर व्याख्यान व प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाचे जवान कशाप्रकारे आपले कर्तव्य बजावत असतात हे जाणून घेत अग्निरोधक उपकरण त्याचे प्रकार व वापर तसेच विविध क्षेत्रातील आगी, अपघात याबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांकडून उस्फूर्तपणे नेहमीप्रमाणेच प्रतिसाद मिळाला आणि शिक्षकांनी अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे आणि जवानांचे आभार मानले.

“अग्निशमन दल सातत्याने याप्रमाणे जनजागृतीपर विविध उपक्रम राबवित असते. नागरिकांकडून देखील याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळतो. प्रत्येकजण याबाबत जागरुक असावा जेणेकरून आपले शहर यापासून सुरक्षित राहण्यास मदतच होईल.” देवेंद्र पोटफोडे अग्निशमन प्रमुख, पुणे मनपा

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×