Breking News
भारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामपुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंदमोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खूनअण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीससोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदलसाहित्यरत्न लोकशातिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसध्येला समाजरत्न पुरस्कार समारंभपुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार ‘अंकनाद गणित सात्मीकरण प्रणालीबालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा उपक्रम आदिवासी मुलांसाठी संरक्षणात्मक वातावरण करण्यास उपयुक्त-प्रदीप देसाई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शहरातील विविध विकासकामांची पाहणी

कामांच्या आराखड्यात नाविन्यता असावी- उपमुख्यमंत्री

marathinews24.com

बारामती – तालुक्यात विविध विकासकामे सुरु असून ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे तसेच मंजूर कामांचा आराखडा तयार करताना त्यामध्ये नाविन्यता असली पाहिजे, याकरिता तज्ज्ञ वास्तूविशारद, अनुभवी व्यक्तींची मदत घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी – सविस्तर बातमी

अजित पवार यांनी तीन हत्ती चौक परिसर, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार निवासस्थान, लेक फ्रंट पार्क येथील पादचारी पुलाचे रेलिंग, फाऊंटन डिझाईन, विव्हींग डेक, उर्दू शाळा बांधकामांची प्लिंथ अंतिम करणे, क्रीडा संकुल तसेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या विश्रामगृहाच्या कामाची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

तीन हत्ती चौक परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. शहरातील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी. कालवा परिसरात स्वच्छता राहील, याबाबत दक्षता घ्यावी. नटराज नाट्य कला मंदिरासमोरील परिसरात कमी उंचीची झाडे लावावीत.

लेक फ्रंट पार्क येथील पादचारी पुलाचे कामे करताना पाण्याच्या वहनक्षमतेला अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. पुलाच्या कामाचा आराखडा करताना ७ मीटर रोड आणि बाजूस ३ मीटर पदपथ याप्रमाणे करावे. त्याचप्रमाणे जड, अवजड वाहनांच्या रहदारीचा विचार करावा. परिसरातील कलाकार कट्ट्याला फलक लावावा.

उर्दू शाळेचा विकास दर्जेदार होण्याकरिता शाळेच्या आराखड्यात शिक्षक, विद्यार्थ्यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा समावेश करावा. तसेच आकर्षक प्रवेशद्वार, वाहनतळ, परिसरातील रस्ते, संरक्षक भिंत, सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता लागणारे मंच, क्रीडांगण आदी बाबी समाविष्ट कराव्यात. आवश्यक त्या सर्व परवानग्या घ्याव्यात. मुस्लीम समाजाला उपयुक्त शादीखान्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.

क्रीडा संकुल परिसरातील प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावी. संकुलात स्वच्छ सूर्यप्रकाश राहील, अशी भितींला रंगरंगोटी करावी. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या विश्रामगृहाच्या आतील पदपथावर पाणी साचणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. दर्शनी भागात नावाचे फलक लावावा. परिसरातील जागेचे सपाटीकरण करून घ्यावे आणि अधिकाधिक वृक्ष लागवड करावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या.

माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

माळेगाव येथील तालुका क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, क्रीडा संकुल समिती सदस्य बापूराव तावरे आदी उपस्थित होते.

माळेगाव तालुका क्रीडा संकुल ११ एकर मध्ये साकारलेले असून या बहुउद्देशीय हॉलमध्ये इनडोअर तायक्वांदो, जुडो, कुस्ती, कबड्डी ,कराटे, बॅडमिंटन यासारख्या क्रीडा स्पर्धा या हॉलमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. हॉलच्या बाजूला आंतरराष्ट्रीय दर्जेच्या १० मीटर, २५ मीटर व ५० मीटर शूटिंग रेंज तसेच अद्यावत व्यायामशाळा आदी कामे करण्यात येणार आहेत.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी किशोर माने आदी उपस्थित होते.

 

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top