Breking News
जय गणेश पालकत्व योजना आदर्श व्यक्ती घडविणारी शाळाशिवराज्याभिषेक दिनी सोमेश्वरवाडीत रक्तदानाचा विक्रम; १२०३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागवैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वारपर्वती परिसरात तरुणाला चाकूच्या धाकाने लुटलेगॅस देयकाच्या नावाखाली महिलेची अडीच लाखांची फसवणूकजागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात साडेतीन हजाराहून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त सहभागपुण्यात रेव्ह पार्टीवर गुन्‍हे शाखेचा छापा – आयोजकांसह 78 जणांवर गुन्‍हा दाखल‘पेन्शन कार्ड’च्या बतावणीने ज्येष्ठाची १६ लाखांची फसवणूकउत्पादन, वितरण अन् बाजारपेठेची साखळी निर्माण करून महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती करावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहनमाजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या कुटुंबीयांचे डॉ. नीलम गोऱ्हेंकडून सांत्वन

पुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंद

पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पोलीस आयुक्तांचा दणका

marathinews24.com

पुणे – पुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंद – बांग्लादेशी अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणार्‍या आरोपींना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दणका दिला आहे. याप्रकरणी संबंधित कुंटणखाना तब्बल ३ वर्षांसाठी सीलबंद करण्यात आला आहे. अवैध व बेकायदेशीर धंद्याबाबत कोणताही मुलाहिजा न बाळगता कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार फरासखाना पोलिसांनी पोक्सो अ‍ॅक्टनुसार कारवाई करीत आरोपींना अटक केली होती.

मोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खून – सविस्तर बातमी 

बबीता मोहम्मद शबीर शेख (वय ६१ रा. ९९४, बुधवार पेठ ) चंपा ऊर्फ विष्णुमाया दिनेश लामा (वय ५१ रा. फ्लॅट नं १८ / ए, बुधवार पेठ, मूळ-नवकोट, नेपाळ कुंटणखाना चालक) यांनी बांग्लादेशी अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्यव्यवसाय करून घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांच्या व्यावसायाचे ठिकाण सील करण्याचा आदेश देण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या आदेशानुसार कुंटणखाना सि.स.नं. ९९४, बुधवार पेठ, नवीन बिल्डींग, तीसरा मजला, फ्लॅट नं १८/ए सीलबंद केला आहे.

कुंटणखाना ३ वर्षांसाठी असा केला सील

कुंटणखाना सील करण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी तत्कालीन उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांना अपर आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्फतीने पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अमितेश कुमार यांना प्रस्ताव सादर केला होता. प्रकरणाची सुनावणी करून कुंटणखान्यामधून आरोपींना निष्कासीत करून ३ वर्षांसाठी सीलबंद करण्याचे आदेश पारित केले. ही कामगिरी उपायुक्त कृषिकेश रावले, एसीपी अनुजा देशमाने, पोलीस निरीक्षक उत्तम नामवाडे, पोलीस निरीक्षक अजित जाधव, एपीआय वैभव गायकवाड, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, अजय खराड पुंडलिक जुंबड, सुवर्णा मोरे, दिव्या जाधव यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×