Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

उपमहापौर परशुराम वाडेकर अ‍ॅक्शन मोडमध्ये; पहाटे ६ वाजता औंध–बोपोडी प्रभागाची पाहणी

उपमहापौर परशुराम वाडेकर अ‍ॅक्शन मोडमध्ये; पहाटे ६ वाजता औंध–बोपोडी प्रभागाची पाहणी

प्रत्यक्ष फील्डवर उतरून नागरिकांच्या विविध समस्या आणि नागरी सुविधांची केली पाहणी

marathinews24.com

पुणे – पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पदभार स्वीकारताच कामाला सुरुवात केली असून ते अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसून आले आहेत. आज पहाटे ६ वाजता त्यांनी औंध–बोपोडी प्रभागात प्रत्यक्ष फील्डवर उतरून नागरिकांच्या विविध समस्या आणि नागरी सुविधांची पाहणी केली.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून, अर्थसंकल्प ६ मार्च रोजी – सविस्तर बातमी 

या पाहणी दौऱ्यात उपमहापौर वाडेकर यांनी बोपोडी आरोग्य कोठी, नाईक चाळ, भीमज्योत नगर, सर्व्हे नं. २६, पठाण चाळ, रेल्वे गेट, गांधी नगर, भोईटे चाळ तसेच मुंबई–पुणे रोडवरील गेट क्रमांक २० या भागांना भेटी दिल्या.

यावेळी औंध वार्ड कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय भोईर, ए.एस.आय. विनायक चोपडे, संतोष शेलार, मुकादम सोनम गायकवाड, सुपरवायझर पुरुषोत्तम कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान ड्रेनेज लाईन, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालये व मुताऱ्या, रस्त्यांची दुरवस्था तसेच पथदिवे यासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी उपमहापौर वाडेकर यांनी जाणून घेतल्या. या सर्व समस्यांवर तातडीने व प्रभावी कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×