Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

महात्मा फुले वाडा व भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाच्या कामकाजास गती द्यावी- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महात्मा फुले वाडा व भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाच्या कामकाजास गती द्यावी- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

प्रस्तावित स्मारक परिसरातील स्वच्छता आणि सुरक्षितता याबाबत महानगरपालिकेने दक्ष राहण्याच्या दिल्या सूचना

marathinews24.com

पुणे – महात्मा फुले वाडा आणि भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाच्या कामकाजाला गती देण्यासाठी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाशी संबंधित विविध अडचणी, प्रलंबित कामे, महानगरपालिके मार्फत करावयाची कामे, स्मारक समिती च्या अडचणी आणि स्मारकाच्या भविष्यातील आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः कामकाजामध्ये दिरंगाई होऊ नये यासाठी त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आणि पुढील १५ दिवसांत कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले.

हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी महराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेट – सविस्तर बातमी 

बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, मालक आणि भाडेकरू यांचे नुकसान भरपाईचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. याबाबतचा सकारात्मक प्रस्ताव शासनास सत्वर सादर करावा जेणेकरून स्मारकाचे काम गतीने पुढे नेता येईल. कामकाजाचे वेळापत्रक करून त्यानुसार कालबद्धरित्या काम पूर्ण करावे. प्राप्त निधीचा विनियोग वेळेत करण्यासाठी समिती आणि मनपा ने सक्रिय व्हावे. स्मारक प्रकल्पाचे दैनंदिन व्यवस्थापन अधिक नियोजनबद्ध व्हावे यासाठी पुणे महानगरपालिकेने वाड्यामध्ये माहिती देणारे एक कार्यालय स्थापन करावे. नागरिकांना प्रकल्पाची माहिती मिळावी, तसेच समिती अध्यक्षांसाठी देखिल कार्यालयाची गरज असून, स्मारक परिसरातील मनपाची कार्यालये इतर ठिकाणी स्थलांतरित करावीत. स्मारक परिसराचे सर्वेक्षण कामकाज वेळेवर पूर्ण करावे , असे त्यांनी स्पष्ट केले.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य देशासाठी प्रेरणास्थान असून, त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन व्हाव्यात, या उद्देशाने राष्ट्रीय स्मारक उभारणीसंदर्भातील कामकाज मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक हे पुणे शहराचे वैभव ठरावे आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनगौरवाचे जिवंत प्रतिक म्हणून सामन्यांना पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी ठरावे यासाठी आपण सर्वांनी मनापासून काम करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका व समिती अध्यक्षांना दिल्या. स्मारकाचे कामकाजाला गती देण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीला देखिल सक्षम करणे गरजेचे असून त्यांना महानगरपालिके मार्फत आवश्यक सहकार्य करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त अविनाश सपकाळ, उपायुक्त अरविंद माळी, उपयुक्त मालमत्ता वसुंधरा बर्वे, भूसंपादन अधिकारी उपजिल्हाधिकारी श्वेता दारुणकर ,शहर अभियंता प्रशांत वाघमारे व इतर अधिकाऱ्यांसोबत महात्मा फुले वाडा व भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष निलेश गिरमे हे देखिल उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×