Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांचा होणार सन्मान

भाऊसाहेब भोईर यांची पत्रकार परिषदेत माहिती

marathinews24.com

पिंपरी – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेला ९ ऑगस्टला २९ वर्षे पूर्ण झाले आहेत. २३ ऑगस्ट २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड शाखेचा वर्धापनदिन सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने दरवर्षी प्रमाणे शाखेच्या नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देण्याऱ्या मान्यवरांना ‘‘कै. बालगंधर्व’, ‘कै. स्मिता पाटील’, ‘कै. आचार्य अत्रे’, ‘कै. अरुण सरनाईक’, ‘कै. जयंत दळवी’ या मान्यवरांच्या नावे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शहरातील स्थानिक कलाकार व रंगमंचावरील विविध तंत्रज्ञ यांना विषेश पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती अ.भा.मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुहास जोशी, राजेंद्र बंग, संतोष रासने, संतोष शिंदे, गौरी लोंढे,रुपाली पाथरे होते.

अभिनेता अक्षयकुमार आणि अर्शद वारसी यांना पुणे न्यायालयाचा दणका; ‘जॉली एलएलबी ३’ वादाच्या भोवऱ्यात – सविस्तर बातमी 

भोईर म्हणाले, नाट्य परिषदेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात नेहमीच सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवून शहराचे सांस्कृतिक वैभवात भर घालण्याचे कार्य करण्यात येते. शाखेने आजतागायत दोन नाट्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे. या वर्षीही दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ५ वा. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे शाखेच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती संघटना, मुंबईचे विश्वस्त अशोक हांडे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

पुरस्कार देऊन गौरविण्यात येणाऱ्या मान्यवरांची नावे

‘कै. बालगंधर्व पुरस्कार’ – श्री ज्ञानेश पेंढारकर (ज्येष्ठ नाट्य संगीतकार)

‘आचार्य प्र.के. अत्रे पुरस्कार’ – श्री संकर्षण कऱ्हाडे (अभिनेता,कवी, लेखक, निवेदक)

‘कै. अरुण सरनाईक पुरस्कार’ – प्रवीण तरडे (अभिनेता, लेखक, दिग्दर्शक)

‘कै.स्मिता पाटील पुरस्कार’ – स्पृहा जोशी (कवयित्री, अभिनेत्री, निवेदिका)

‘कै. जयवंत दळवी पुरस्कार’ – अरविंद जगताप (नाट्य-सिने-मालिका लेखक)

याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहराचे चे भूषण पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि ज्येष्ठ शास्त्रीयय गायक पं. सुरेश साखवळकर यांचा नाट्य परिषद, मध्यवर्तीचा‘जीवन गौरव पुरस्कार’ मिळाल्यानिमित्त यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

विशेष पुरस्कार

सुवर्णा काळे, रति देशमुख, संदीप उर्फ जम्माड देशमुख, संदीप उर्फ बबलू जगदाळे, सोमनाथ तरटे. याशिवाय राज्यनाट्य स्पर्धा २०२४ चे पुरस्कार विजेत्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात येणार आहेत. यामध्ये मनोहर जुवाटकर,कमलेश बिचे, विनायक परदेशी, अथर्व कुलकर्णी, श्रुती भोसले, दिनेश साबळे यांचा समावेश आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×