Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी वार्षिक टोल (फास्टॅग) पासची सवलत

सदरील योजना फक्त अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी व प्रवाशांसाठी असणार

marathinews24.com

पुणे – पुणे जिल्हयातील खेडशिवापूर टोल प्लाझा, पाटस टोल प्लाझा, सरडेवाडी टोल प्लाझा व चालकवाडी टोल प्लाझा वर अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी, प्रवाशांसाठी वार्षिक टोल (फास्टॅग) पास सुरू होत असल्याचे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांनी कळविले आहे.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी घेतला आढावा – सविस्तर बातमी

ही योजना फक्त अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी व प्रवाशांसाठी असणार आहे. वार्षिक टोल (फास्टॅग) पासची वैधता १ वर्ष किंवा २०० एकेरी वाहनांच्या फेऱ्यांसाठी यापैकी जे आधी होईल ते लागू राहील. फक्त राष्ट्रीय महामार्ग व राष्ट्रीय दुतगती महामार्गावरील टोल प्लाझांसाठी वैध असून, वार्षिक टोल (फास्टॅग) पासची किंमत फक्त तीन हजार रुपये इतकी राहील.

वार्षिक टोल पास (फास्टॅग) मिळविण्यासाठी तसेच सक्रियता आणि नूतनीकरणासाठी राजमार्ग यात्रा मोबाईल ॲपवर तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी १०३३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असेही प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांना प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×