Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

मुंढव्यात हाॅटेल मालक आणि रहिवाशांमध्ये वाद

मद्यधुंद अवस्थेतील तरुणांनी रस्त्यात बाटल्या फोडल्या

marathinews24.com

पुणे – पार्टी साजरी करणाऱ्या मद्यधुंद अवस्थेती लतरुणांनी रस्त्यावर गोंधळ धालून दारूच्या बाटल्या फोडल्याची घटना मुंढवा परिसरात रविवारी रात्री घडली.या घटनेनंतर या भागातील रहिवाशांनी थेट हाॅटेल मालकाला विचारला. हाॅटेल मालक आणि रहिवाशांमध्ये वाद झाल्याने रविवारी रात्री मुंढवा परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी तेथे धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू – सविस्तर बातमी

मुंढवा भागात नव्याने एक पब आणि हॉटेल सुरू झाले आहे. रविवारी ( १७ ऑगस्ट) हाॅटेलमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. रात्री दहाच्या सुमारास मध्यधुंद तरुणांनी परिसरात गोंधळ घातला. रस्त्यात दारूच्या बाटल्या फोडण्यात आल्या. या वेळी स्थानिक रहिवाशांनी त्यांना जाबा विचारला. तेव्हा मद्यधुंद अवस्थेतील तरुणांनी रहिवाशांना शिवीगाळ केली, असा आरोप रहिवाशांनी केला. या घटनेनंतर रहिवशांनी हाॅटेलमध्ये धाव घेतली आणि मालकाला जाब विचारला. बाचााबाची झाल्यााने हाॅटेलच्या परिसरात तणाव निर्माण झाले. हाणामारीपर्यंत वाद पोहोचल्याने त्वरीत या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी त्वरीत हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसानी हाॅटेलमालक आणि रहिवाशांची बाजू ऐकून घेतली. हाॅटेलमालकाला पाोलिसांनी सूचना दिल्या. हाॅटेलच्या परिसरात गैरप्रकार झाल्यास कारवाई करण्यात येईल, अशा सूचना हाॅटेलमालकाला पोलिसांनी दिल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×