दिवे घाट आज दोन तास बंद

रुंदीकरणाच्या कामामुळे पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – आळंदी ते पंढरपूर पालखी मागार्चे रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यत येत आहे. सोमवारी (२३ फेब्रुवारी) दुपारी एक ते तीन या वेळेत दिवे घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे – पुलकुंडवार – सविस्तर बातमी

दिवे घाटात रुंदीकरणाचे काम नियंत्रित स्फोटाद्वारे (ब्लास्टिंग) करण्यत येणार आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने दिवे घाटातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे वाहनचालकांनी कोंढवा, येवलेवाडीमार्गे बोपदेव घाट या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×