Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Diwali With A Purpose Pune : कर्करोगग्रस्त रुग्णांना भावनिक आधार; दिवाळी विथ अ पर्पज’ उपक्रम

Diwali With A Purpose Pune

केअर इंडिया मेडिकल सोसायटीचा उपक्रम

marathinews24.com

पुणे – Diwali With A Purpose Pune : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. या सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या भावनेतून केअर इंडिया मेडिकल सोसायटी (विश्रांती हॉस्पिटल) यांच्या वतीने कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘दिवाळी विथ अ पर्पज’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (दि.१४) सकाळी साडे दहा वाजता कमांड हॉस्पिटल संकुलातील चरक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

शेतकऱ्याचा बाप सरणावर, सरकार उत्सवाच्या तयारीत – सविस्तर बातमी 

कर्करोगग्रस्त रुग्णांना वैद्यकीय उपचारांसोबतच मानसिक आणि भावनिक आधार मिळावा, त्यांच्यामध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी तसेच रुग्णालयाकडून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांबाबत त्यांचे प्रत्यक्ष अनुभव आणि अभिप्राय जाणून घेता यावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. (Diwali With A Purpose Pune) या निमित्ताने रुग्णांशी संवाद साधून त्यांना आपले अनुभव मांडण्याची संधी देण्यात येणार असून, कर्करोगाशी संघर्ष करताना त्यांनी दाखविलेल्या धैर्याचा, जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणेचे संचालक व कमांडंट सर्ज व्हाइस अॅडमिरल मनीष होनवाड (विशिष्ट सेवा पदक), महाविद्यालयाचे अधिष्ठाता व उपकमांडंट मेजर जनरल अतुल सेठ (विशिष्ट सेवा पदक) तसेच कमांड हॉस्पिटल (दक्षिण विभाग), पुणेचे कमांडंट मेजर जनरल सनिल मोहन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

निवृत्त लेफ्टनंट जनरल एम. ए. तुतकणे, निवृत्त कर्नल एन. एस. न्यायापती, विश्वस्त मंडळाचे सदस्य, ब्रिगेडियर एल. व्ही. सदाशिवन तसेच केअर इंडिया मेडिकल सोसायटीचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. उपक्रमाच्या माध्यमातून कर्करोगग्रस्त रुग्णांच्या जीवनात आनंद, आशा आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच त्यांच्या भावनिक गरजा समजून घेण्याचा केअर इंडिया मेडिकल सोसायटीचा प्रयत्न आहे. दिवाळीच्या निमित्ताने आयोजित हा उपक्रम माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×