Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

‘स्वप्नसुंदरी मी भारताची २०२६’ : पुण्यात सौंदर्य स्पर्धेचे आयोजन

‘स्वप्नसुंदरी मी भारताची २०२६’ : पुण्यात सौंदर्य स्पर्धेचे आयोजन

पुण्यात ‘स्वप्नसुंदरी मी भारताची २०२६’चा जल्लोष; सौंदर्य आणि कलेचा संगमl, रॉयल ग्रुपचा भव्य ब्यूटी पेजेंट ४ मे रोजी होणार

marathinews24.com

पुणे – द रॉयल ग्रुप प्रस्तुत “स्वप्नसुंदरी मी भारताची २०२६” हा बहुप्रतिक्षित ब्यूटी पेजेंट ०४ मे २०२६ रोजी सायं. ४.०० वा. पुण्यात भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने मॉडेलिंग शो आयोजित करत असलेल्या या संस्थेने यंदाही आकर्षक आणि उच्च दर्जाचा कार्यक्रम सादर करण्याची तयारी केली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतील प्रतिभावान मॉडेल्स सहभागी होणार असून सौंदर्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी – सविस्तर बातमी 

श्रमिक पत्रकार भवन या ठिकाणी मॉडेल संजीवनी पाटील, स्मितल ढोले ,ममता भोई दौंडे, सुमिता शिंदे, सोनाली शिंदे, प्रिती मैड, जियाजी डफळे, आकाश रणदिवे, द रॉयल ग्रुप संस्थापक अध्यक्ष नितीन झगरे आणि चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे उपस्थित होते. हा भव्य सोहळा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंदिर, येरवडा येथे पार पडणार असून याच वेळी “इंडिया स्टार जीवनगौरव पुरस्कार २०२६” देखील प्रदान करण्यात येणार आहेत. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव या निमित्ताने केला जाणार आहे.

स्पर्धेचे प्रमुख आयोजक नितीन झगरे असून कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये सुमिता शिंदे, ममता भोई दौंडे, इप्सिता नांदी, डॉ. सीमा इंग्रोळे, सारिका साळवे, सुदीक्षा कदम, नमिता पाटील, योगिता गायकवाड, पूजा तपाडीया तसेच बिग बॉस फेम तृप्ती ताई देसाई यांचा समावेश आहे. याशिवाय दिग्दर्शक रामकुमार शेडगे आणि लेखक आबा गायकवाड हेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामुळे पुणे शहरात ग्लॅमर, कला आणि सांस्कृतिक वैभवाचा अनोखा मिलाफ अनुभवायला मिळणार असून स्पर्धकांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×