Accident News : ट्रकवर टेम्पो आदळून चालक ठार, क्लिनर जखमी

दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

लोणीकंद भागातील अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव टेम्पो ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात घडली. अपघातात टेम्पोतील क्लिनर गंभीर जखमी झाला. ईश्वर बाळासाहेब उगले (वय ३४, रा. गोगलगाव, ता. राहता, जि. अहिल्यानंगर ) असे मृत्युमुखी पडलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. क्लिनर सुनील किशोर नेहे (वय २२, रा. डिग्रस, ता. राहता, जि. अहिल्यानगर) जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ट्रकचालक विक्रम विठ्ठल बाबर (वय ३७, रा. डोंगरगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी; डॉक्टर महिलेला ५लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद भागातून रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव टेम्पो निघाला होता. त्यावेळी भरधाव टेम्पो ट्रकवर पाठीमागून आदळला. अपघातात टेम्पोचालक उगले आणि क्लिनर नेहे हे गंभीर जखमी झाले. टेम्पो, तसेच ट्रकचे नुकसान झाले असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांंना रुग्णालयात दाखल करण्यात आले. भरधाव टेम्पो चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी लोणींकद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे तपास करत आहेत.

कात्रज घाटात वाहनाच्या धडकेत तरूण ठार

Accident News : वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२८ जून) रात्री घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल केला आहे. वैâलास नारायण आखुटे (वय ५६, रा. संभाजीनगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव अंदाजे ३५ ते ४० वर्षदरम्यान आहे. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती आंबेगाव पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक कोळी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×