Breking News
Pune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळाMobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यात

हडपसर, वाकडेवाडी परिसरातून आठ लाखांचे अमली पदार्थ जप्त

हडपसर, वाकडेवाडी परिसरातून आठ लाखांचे अमली पदार्थ जप्त

अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; पाच जण अटकेत

marathinews24.com

पुणे – हडपसर, वाकडेवाडी परिसरातून आठ लाखांचे अमली पदार्थ जप्त – वाकडेवाडी आणि हडपसर परिसरात कारवाई करून गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विराेधी पथकाने ७ लाख ८८ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत आरोपींकडून अफुच्या बोंडाचा चुरा, तसेच गांजा असे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली.

बांगलादेशी तरुणीला धमकावून वेश्याव्यवसायात धाडले – सविस्तर बातमी 

हडपसर भागातील मांजरी परिसरात अफुच्या बोंडांचा चुरा विक्रीसाठी आलेल्या राजस्थानमधील दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून २ लाख १५ हजार ५०० रुपयांचा तीन किलो अफुच्या बोंडाचा चुरा जप्त करण्यात आला. राकेश अर्जुनदास रामावत (वय ४१), ताराचंद सीताराम जहाँगीर (वय २६, दोघे रा. खेडकर मळा, पांगारे वस्ती, ऊरळी कांचन, मूळ रा. राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मांजरी रस्त्यावर अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्या वेळी दोघे जण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. रामावत आणि जहाँगीर यांच्याकडून पोत्यात भरलेला अफुचा बोंडांचा चुरा जप्त करण्यात आला.

मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५ लाख ७२ हजार रुपयांचा २१ किलो गांजा जप्त करण्यात आला. भागवत शिवाजी मंडलिक (वय २६, रा. विमल गार्डनजवळ, रहाटणी,), मुसीम सलीम शेख (वय २६) , महेेश नारायण कळसे (वय २४, दोघे रा. शिरुर कासार, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड, पोलीस कर्मचारी प्रफुल्ल मोरे, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, संदीप जाधव, उदय राक्षे, प्रशांत बोमादंडी, चेतन गायकवाड, मयूर सूर्यवंशी, साहिल शेख, रवींद्र रोकडे, आझाद पाटील, शेखर खराडे, दिशा खेवलकर यांनी ही कारवाई केली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थ तस्कर, तसेच विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. आठवडभरात पोलिसांनी बिबवेवाडी, कोंढवा, बुधवार पेठ परिसरात कारवाई करुन मेफेड्रोन, गांजा असे अमली पदार्थ जप्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×