मद्यधुंद कार चालकाने डिलिव्हरी बॉयला चिरडले

मद्यधुंद कार चालकाने डिलिव्हरी बॉयला चिरडले

मोटारकार चालक विरोधात गुन्हा दाखल

marathinews24.com

पिंपरी – दारूच्या नशेत भरधाव कार चालवून एका दुचाकीस्वाराला धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना बावधन परिसरात घडली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे बावधन येथील चांदणी चौक, इराणी कॅफेजवळ सार्वजनिक रस्त्यावर घडली. याप्रकरणी ओमकार राम हटकर (वय २४, पर्वती, पुणे) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टेलिग्राम टास्कच्या बहाण्याने तरुणाची १३ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी  

पोलिसांनी मोटारकार चालक तेजस बाबुलाल चौधरी (वय ३२, बावधन) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचा चुलत भाऊ प्रसाद मिसाळ हा स्विगीची ऑर्डर आल्यामुळे आपल्या दुचाकीसह इराणी कॅफेजवळ थांबला होता. यावेळी आरोपी तेजस चौधरी याने दारूच्या नशेत आपली मोटारकार हयगयीने चालवून प्रसादच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात प्रसादच्या बरगड्यांना गंभीर फ्रॅक्चर झाले असून दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बावधन पोलीस तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×