शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या परिसरात मद्यपी टोळक्याचा गोंधळ

पोलीस शिपायाला धक्काबुक्की

marathinews24.com

पुणे – शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या परिसरात मद्यपी टोळक्याने गोंधळ घालून पोलीस शिपायाला धक्काबुक्की केल्याची घटना घडली. शासकीय कामात अडळा आणणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्य पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सहा जणांना अटक केली.

कोथरूड, पाषाण भागात घरफोडी – सविस्तर बातमी

याबाबत पोलीस शिपाई अक्षय डिंडोरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी नाना बापू नाईकनवरे (वय २४), सनी मुकेश नाईकनवरे (वय २२, दोघे रा. एसआरए वसाहत, विमाननगर), दक्षेश विठ्ठल कुरपे (वय २४, रा. सरगम सोसायटी, वारजे जकात नाका), गणेश संजय तुपसैांदर (वय २२, रा. कुंभारवाडा चौक, कसबा पेठ), विकी कारंडे (वय २४, रा. बराटे चाळ, कर्वेनगर), सार्थक कदम यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविवारी शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या परिसरात कामगार पुतळा परिसरात थांबले होते. त्यांनी दारू पिऊन रस्त्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सार्वजनिक ठिकाणी मद्यपी टोळके गोंधळ घातल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस शिपाई डिंडोरे तेथे गेले. त्यांनी आरोपींना रस्त्यात गोंधळ घालू नका, असे सांगितले. तेव्हा आरोपींनी डिंडोरे यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा आणणे, धक्काबुक्की करणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्य पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×