Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ दाम्पत्याची २४ लाखांची फसवणूक

वाहतूक नियमभंगाचे बनावट चलन पाठवून फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा

marathinews24.com

पुणे – अटकेची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ दाम्पत्याची २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला.

औंधमध्ये सराफी पेढीत लुटमारीचा प्रयत्न – सविस्तर बातमी

याबाबत एका ज्येष्ठाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६९ वर्षीय ज्येष्ठ आणि त्यांची पत्नी हे वारजे भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर ९ ऑगस्ट रोजी संपर्क साधला. ‘डाटा फायनान्स ऑफ इंडिया’ या संस्थेतून बोलत असल्याची बतावणी चाेरट्यांनी त्यांच्याकडे केली होती. काळ्या पैशांच्या व्यवहारात कारवाई करण्यात येणार असून, या प्रकरणात अटक करण्यात येईल, अशी भीती दाखवून चोरट्यांनी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे पाठविण्यास सांगितले. चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यांत त्यांनी चार दिवसांत २४ लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना आणखी रक्कम पाठविण्यास सांगितले. दाम्पत्याला संशय आल्याने त्यांनी चौकशी केली. चौकशीत फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे तपास करत आहेत.

गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने बिबवेवाडी भागातील एका ज्येष्ठ महिलेची दहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला बिबवेवाडीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. चोरट्यांनी महिलेला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने दहा लाख रुपये जमा केले. सुरुवातीला महिलेला चोरट्यांनी परतावा दिला. त्यानंतर परतावा, तसेच मूळ रक्कम दिली नाही. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बेंद्रे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×