Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

औंधमध्ये सराफी पेढीत लुटमारीचा प्रयत्न

मंदिरातील दानपेटीतून ४० हजारांची रोकड चोरीला

चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सराफी पेढीच्या मालकाला मारहाण करुन चोरट्यांनी तीक्ष्ण शस्त्राच्या धाकाने दागिने लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (१५ ऑगस्ट) घटना ओैंधमधील डीपी रस्त्यावर घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसंनी तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सराफी पेढीच्या मालकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अपघातात दोन दुचाकीस्वार तरुणांचा मृत्य – सविस्तर बातमी

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार सराफी पेढीचे मालक पिंपरी-चिंचवडमधी रहाटणी भागात राहायला आहेत. ओैंधमधील डीपी रस्त्यावरील एका इमारतीत त्यांची सराफी पेढी आहे. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास तीन चोरटे सराफी पेढीत शिरले. सराफी पेढीच्या मालकाला चाकूचा धाक दाखविला. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. सराफी पेढीच्या मालकाने आरडाओरडा करुन चोरट्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. घाबरलेल्या सराफी पेढीच्या मालकाने पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, नरेंद्र पाटील, सचिन करांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चाेरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक निरीक्षक पोटे तपास करत आहेत.

गहाळ झालेले मोबाइल परत, शिवाजीनगर पाेलिसांची कामगिरी

पुणे – गहाळ झालेले मोबाइल संच परत मिळेल, याची शाश्वती नसते. शिवाजीनगर पोलिसांनी नागरिकांचे गहाळ झालेले ४१ मोबाइल संच परत मिळवून दिले. स्वातंत्र्यदिनाचे ओैचित्य साधून परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले यांच्या हस्ते मोबाइल संच तक्रारदारांना परत करण्यात आले. गहाळ झालेले मोबाइल संच परत मिळाल्याने तक्रारदारांनी आनंद व्यक्त केला.

मोबाइल संचात महत्वाची माहिती, छायाचित्रे असतात. मोबाइल संचाच्या किंमतीपेक्षा महत्वाची माहिती गहाळ झाल्याने तक्रारदार हळहळ व्यक्त करतात. शिवाजीनगर परिसरातील गर्दीच्या ठिकाणांहून नागरिकांचे मोबाइल संच चोरीला गेले होते, तसेच काहींचे मोबाइल संच गहाळ झाले होते. या प्रकरणी तक्रारदारांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांच्या सायबर पथकाने गहाळ झालेल्या मोबाइल संचांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तांत्रिक तपासात गहाळ झालेले मोबाइल संच परराज्यात वापरत असल्याचे उघडकीस आले होते. मोबाइल क्रमांकात नवीन सीमकार्ड टाकून ते वापरात होते. पोलिसांनी मोबाइल संचाचा आयएमईआय क्रमांकावरुन तपास केला. तांत्रिक तपास करून ४१ मोबाइल संच शोधून काढले. मोबाइल संच शिवाजीनगर पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले. महागडे मोबाइल संच परत मिळाल्याने तक्रारदारांनी आनंद व्यक्त केला.

परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले .यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, गुन्हे शाखेचे निरीक्षक धंनजय पिंगळे, उपनिरीक्षक मनिषा वलसे, पोलीस कर्मचारी नलिनी क्षीरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, नवनाथ आटोळे यांनी ही कामगिरी केली. मोबाइल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास नागरिकांनी पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर किंवा राज्यशासनाच्या ‘सीईआयआर’ या पोर्टलवर नोंद करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×