रामटेकडीत ज्येष्ठाला मारहाण करुन लूटले

पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – हडपसरमधील रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीत पादचारी ज्येष्ठाला मारहाण करुन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची साेनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ७५ वर्षीय ज्येष्ठाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रवेशाच्या आमिषाने विद्यार्थ्याची साडेआठ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीतील एका सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदार हे १२ डिसेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घरातून फिरायला बाहेर पडले. मधुबन सोसायटी रस्त्यावर चौघांनी त्यांना अडवले. त्यांना धक्काबुक्की करुन चोरट्यांनी गळ्यातील दीड लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×