प्रवेशाच्या आमिषाने विद्यार्थ्याची साडेआठ लाखांची फसवणूक

पुण्यात निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांकडून अडीच कोटींची फसवणूक

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कोथरूड भागातील एका नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने विद्यार्थ्याची पावणेनऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एकाविरुद्ध नऱ्हे (सिंहगड रस्ता) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ वर्षीय विद्यार्थ्याने फिर्याद दिली आहे.

बंगल्यात रंगकाम करताना पडल्याने मजुराचा मृत्यू – सविस्तर बातमी

तक्रारदार तरुण सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक भागात राहायला आहे. ४ ऑक्टोबर रोजी एकाने तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. कोथरूड भागातील एका नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष चोरट्याने त्याला दाखविले. प्रवेशासाठी शैक्षणिक संस्थेला पाच लाख रुपये देणगी, तसेच तीन लाख ७६ हजार रुपये शैक्षणिक शुल्क भरावे लागेल, अशी बतावणी चोरट्याने केली. त्यानंतर विद्यार्थ्याने याबाबतची माहिती पालकांना दिली.

विद्यार्थ्याने शहनिशा न करता पुन्हा चोरट्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. चोरट्याने त्याला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. चोरट्याच्या खात्यात तरुणाने एकूण मिळून आठ लाख ७६ हजार रुपये जमा केले. बँक खात्यात पैसे जमा केल्यानंतर चोरट्याने त्याचा मोबाइल क्रमांक बंद केला. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×