Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

बंगल्यात रंगकाम करताना पडल्याने मजुराचा मृत्यू

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

सहकारनगर भागातील घटना; एक मजूर जखमी

marathinews24.com

पुणे – बंगल्यात रंगकाम करताना तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना सहकारनगर भागात घडली. दुर्घटनेत आणखी एक मजूर जखमी झाला असून, मजुरांच्या सुरक्षेबाबत पुरेशी काळजी न घेतल्याने ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक सेघे गुप्ता (वय ३०, सध्या रा. कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. या घटनेत दीनानाथ मेणक चौधरी (वय ४३, सध्या रा. कात्रज) जखमी झाला आहे.

दुचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू – सविस्तर बातमी

दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदार अफसर शेख, क्रांतीलाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुन्ना जोखुप्रसाद गुप्ता (वय ३९, रा. बालाजीनगर, धनकवडी, पुणे-सातारा रस्ता) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर भागातील गणेशदत्त सोसायटीत एका बंगल्यात रंगकाम करण्यात येत होते. मंगळवारी (१५ डिसेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावर दीपक गुप्ता आणि दीनानाथ चौधरी हे रंगकाम करत होते. त्यावेळी तोल जाऊन गुप्ता आणि चौधरी पडले. दोघे जण गंभीर जखमी झाले. गुप्ता आणि चौधरी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान गुप्ता याचा मृत्यू झाला.

ठेकेदाराने रंगकाम करणाऱ्या मजुरांना सुरक्षाविषयक साधने पुरविली नाही, तसेच तेथे संरक्षक जाळी बसविली नाही. सुरक्षाविषयक उपाययाेजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे मुन्ना गुप्ता यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×