Breking News
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

मोटारीला धडक देउन जेष्ठाला लुटले; विमानतळ रस्त्यावरील घटना

पीएमपीएल प्रवासी महिलांचे दीड लाखांचे दागिने लांबविले

पुण्यात लुटमारीच्या घटना सुरूच

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात रात्री-अपरात्री प्रवास करणार्‍यांना अपघाताची बतावणी करीत लुटल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, लुटमार करणार्‍या टोळ्यांचा बिमोड करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, मध्यरात्रीनंतर उपनगरात संबंधित टोळ्या कार्यरत झाल्यामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

तरूणावर चाकूने वार, दोघांविरूद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

मोटारीतून प्रवास करीत असलेल्या एकाच्या गाडीला दुसर्‍या मोटार चालकाने धडक दिली. त्यानंतर त्यांना अडवून शिवीगाळ करीत टोळक्याने साडेचार हजारांची रोकड, गळ्यातील १ लाख ३२ हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेली आहे. ही घटना २९ डिसेंबरला रात्री सव्वा एकच्या सुमारास विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजय पार्क फाटा समोरील रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी कळस परिसरात राहणार्‍या ५९ वर्षीय नागरिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तिघा अनोखळी चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कळस परिसरात राहायला असून, २९ डिसेंबरला रात्री सव्वा एकच्या सुमारास मोटारीतून संजय पार्क फाटा परिसरातून प्रवास करीत होते. त्यावेळी पाठीमागून मोटारीत आलेल्या तिघांनी त्यांच्या मोटारीला धडक दिली. काही अंतरावर त्यांना अडवून शिवीगाळ करीत साडेचार हजारांची रोकड हिसकावून घेतली. तक्रारदाराच्या गळ्यातील १ लाख ३२ हजारांची सोन्याची चैन चोरून टोळके पसार झाले. दरम्यान, तक्रारदाराने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×